पुणे

जवण घाटात सुरक्षेचा अभाव

CD

पांडुरंग साठे ः सकाळ वृत्तसेवा
कोळवण, ता. १४ ः कोळवण (ता. मुळशी) परिसरातील कोळवण- काशिग रस्त्यावर मुळशी तालुका व मावळ तालुका या दोन तालुक्यांच्या हद्दीवर जवणच्या घाट उतारावर एक धोकादायक विहीर आहे. दोन तालुक्यांना जोडणाऱ्या मध्यवर्ती सीमेवर ही विहीर असून, ती वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. विहिरी शेजारी आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेवेळी लोखंडी जाळीची सुरक्षा भिंत उभी केली आहे. मात्र, येथे अनेक उपाययोजनांचा अभाव आहे. या विहिरीच्या सुरक्षेची जबाबदारी ही काशिग ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची आहे.
याबाबत मावळ तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता धनराज दराडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

या उपाययोजनांचा अभाव
विहिरीस कमी उंचीचे दगडी बांधकाम
कठडे जीर्ण व कमकुवत
चेतावणी फलक नाही
परावर्तक नाही
लाइट व्यवस्था नाही

ही विहीर सन १९७२ च्या दुष्काळात बांधली आहे. अनेक वर्ष या विहिरीचा उपयोग होत होता. कालातरांने वेगळ्या योजना झाल्याने विहीर वापराविना पडून आहे. सायकल स्पर्धेमुळे रस्ता चांगला झाला पण विहीर रस्त्यात आली. त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. भविष्यात अपघात होऊ नये म्हणून शासन स्तरावर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी.
- संतोष टेमघरे, स्थानिक शेतकरी, काशिग

कोळवण- काशिग- जवण रस्त्यावरील विहीर असणारी जागा मावळ तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाचे हद्दीत येते.
- संकेत साळुंके, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुळशी

03113

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mumbai: रुग्णाला रक्ताची गरज, बेड नाही म्हणत उपचार नाकारले; मुंबईतील मोठ्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

Baramati Sugarcane Farming: पणदरेत ‘ऊस शेतीची नवी दिशा’ परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक दिशा

Chakan Onion Price Row: कांदा दरप्रश्नी चाकण बैठक की राजकीय आखाडा? शेतकरी संघटनेच्या नेत्यांत वाद

SCROLL FOR NEXT