पुणे

करमोळी पुलाजवळ वैद्यकीय कचऱ्याचे ढीग

CD

कोळवण, ता. २६ : पौड- कोळवण (ता. मुळशी) रस्त्यावरील करमोळी पुलाजवळ मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला आहे. इंजेक्शनच्या सुया, सिरिंज आणि औषधांच्या बाटल्यांमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून, प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या परिसरात भटक्या जनावरांचा वावर आणि शालेय विद्यार्थ्यांची ये- जा मोठ्या प्रमाणात असते. उघड्यावरील सुया आणि सिरिंजमुळे लहान मुलांना इजा होण्याचा किंवा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. नियमांनुसार वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना, अशा प्रकारे बेजबाबदारपणे कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
स्थानिक नागरिकांनी आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडे हा कचरा तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी रुग्णालये किंवा संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

03132

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्नपत्रिकेवर वधु-वरांची जन्मतारीख बंधनकारक, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

Pune Crime : पुण्यात खळबळ! मैत्रीचा झाला रक्तरंजित शेवट; सिमेंटच्या दगडाने मित्राला संपवलं

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर दरड कोसळली

Electric Vehicles Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दणक्याला 'इलेक्ट्रिक' उत्तर! ई-वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ; राज्यात नऊ लाख, तर जळगावात 23 हजार 'ईव्ही'

लग्न मान्य नव्हतं, केतनला लोहगडावरून ढकललं; सिया गोयल आणि चेतन चौधरी कोण? प्रियकराचं होतं रणजी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न

SCROLL FOR NEXT