पुणे

नवोदय परीक्षा अर्जासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

CD

शिक्रापूर, ता. ९ ः ३० जानेवारीपर्यंत मुदत असलेल्या केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेसाठीची अर्ज भरण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत वाढविल्याची माहिती प्राचार्य बी. आर.खेडकर यांनी दिली.

जिल्ह्यातून साधारण साडेतेरा हजारांच्यावर इयत्ता पाचवीतील विद्यार्थी या परीक्षेसाठी दरवर्षी बसतात. वेबसाइट हॅंग होणे, काही तांत्रिक अडचणी येणे, ग्रामिण भागात अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध नसणे या अडचणींचा विचार करुन पुणे जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या नवोदय विद्यालय समितीने वरील अर्ज मुदतवाढीचा निर्णय घेतला असून, अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले नसतील त्यांनी अर्ज भरण्याचे आवाहन खेडकर यांनी केले.

दरम्यान शिल्लक इयत्ता पाचवीच्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांनी पुन्हा सूचना कळवून अर्ज भरवून घेण्यासाठी पुढाकार घेण्याचेही आवाहन करण्यात आले. यावर्षीची परीक्षा २९ एप्रिल रोजी पुणे शहर-जिल्हा व पिंपरी चिंचवड येथील ३५ केंद्रांवर होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
अर्ज भरण्यासाठी वेबसाइट : www.navodaya.gov
-----------------------
चार जागांची परीक्षा ११ फेब्रुवारीला
इयत्ता सहावीपासून ते आठवीपर्यंत जे विद्यार्थी नवोदय विद्यालयात दाखल होऊन विद्यालय सोडतात त्या रिक्त जागा इयत्ता नववीसाठी भरल्या जातात. यावर्षी या नववीसाठीच्या रिक्त जागा चार एवढ्या असून, सदर परीक्षा शनिवारी (ता. ११) पिंपळे-जगताप येथील नवोदय विद्यालयासह शेजारीच असलेल्या वसंतराव डावखरे विद्यालयात होणार आहे. सदर परीक्षेसाठी एकूण ६२८ विद्यार्थी परीक्षेला बसल्याचेही प्राचार्य खेडकर यांनी सांगितले.
-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

क्षुल्लक कारणावरून वाद, लाथाबुक्यांनी मारहाण करत बंदुकीचा धाक; शिवसेनेतील नेत्याच्या मुलाला ठार मारण्याची धमकी; ठाण्यात काय घडलं?

Marathi News Live Updates: काढणीआधीच चार एकर ऊस जळून खाक; विद्युत तारांमधून ठिणगी पडल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Pune PMPML Security: सुरक्षेसाठी कोट्यवधींचा खर्च, तरी आगारांत सुरक्षारक्षकच नाहीत; पीएमपीएमएलचा धक्कादायक कारभार उघड

SCROLL FOR NEXT