पुणे

सणसवाडीतील कंपन्यांकडे खंडणीची मागणी

CD

शिक्रापूर, ता. १५ : ‘कॉन्ट्रॅक्ट द्या, नाही तर दर महिन्याला मला व माझ्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाला पैसे द्या,’ असे म्हणून खंडणी मागणाऱ्या मानव विकास परिषद संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष नीलेश दरेकर याच्यावर सणसवाडी (ता. शिरूर) येथील दोन कंपन्यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल केला.
याबाबत शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी माहिती दिली की, आरोपींनी सणसवाडी येथील अ‍ॅक्टीव्ह क्रोमवेल एक्झॉस्ट प्रा.लि. व यझाटा इस्टेट प्रोजेक्ट कंपनीकडे कंपनी जागा एनए असल्याचे पुरावे, पीएमआरडीए परवानगी कागदपत्रे-बांधकाम परवानगी व मंजूर बांधकाम, अग्निशामन विभागाची ना हरकत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानग्या आदी मागविले. हे सर्व वेळेत न दिल्यास पीएमआरडीए कार्यालयापुढे आंदोलनाचा इशारा दिला. तसेच, ‘अग्नीविरोधी यंत्रणेच्या कामाचा ठेका किंमत जास्त असली; तरी आम्हालाच द्या, दोन्ही ठिकाणी दर महिन्याला मला व माझ्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाला पैसे द्या,’ अशी मागणी करत जिवे मारण्याच्या धमकीसह खंडणी मागितली. याबाबत ‘यझाटा’चे मालक इराझ फरिदानी व ‘अ‍ॅक्टीव्ह क्रोमवेल एक्झॉस्ट’चे प्रवीण बडदे यांच्या फिर्यादीवरून नीलेश दरेकर व संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख या दोघांच्या विरोधात दोन स्वतंत्र खंडणीचे गुन्हे दाखल केले. दरेकर याला अटक केली असून, शेख याला पकडण्यासाठी एक पथक रवाना केले.

तक्रार करण्याचे आवाहन
शिक्रापूर-सणसवाडी परिसरातील कंपन्यांमध्ये अनेकजण आपली दहशत करून कंपन्यांचे ठेके थेटपणे स्वत: घेत उद्योगांना दहशतीत ठेवण्याचे प्रकार करीत आहेत. अशा काही स्थानिक व बाहेरील व्यक्तींची नावे शिक्रापूर पोलिसांनी संकलित केलेली आहेत. मात्र, फक्त तक्रार दाखल करण्याची वा पोलिसांना कळविण्याची (९०७७१००१००) आम्ही वाट पाहत असून तक्रारकर्त्यांची नावे गुप्त ठेवण्याबरोबरच ठोस कारवाईचीही ग्वाही शिक्रापूर पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : घनसावंगी पंचायत समितीच्या कामांमध्ये दुमजली कामाचा स्लॅबचा कॉलम पडून मुजराचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT