पुणे

शिक्रापूरच्या महिला तलाठ्यांना माजी उपसरपंचांकडून शिवीगाळ

CD

शिक्रापूर, ता. २३ : येथील तलाठी कार्यालयात जाऊन महिला तलाठी यांना जातिवाचक शिवीगाळ करून कार्यालयातील कागदपत्रे अस्ताव्यस्त करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेश राघोबा थोरात यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, येथील तलाठी सुशीला गायकवाड या सोमवारी (ता. २२) कार्यालयात कामकाज करत असताना माजी उपसरपंच रमेश थोरात हे कार्यालयात आले. त्यांनी तलाठी गायकवाड यांना, ‘माझ्या प्लॉटिंगच्या व्यवसायातील काही दस्त मी तुम्हाला नोंदणीसाठी दिलेले बरेच दिवस झाले, तरी तुम्ही नोंदणी का करत नाही?’ अशी विचारणा करीत वाद घालण्यास सुरवात केली आणि त्यांच्या सरकारी कामातही अडथळा आणला. त्यांनतर गायकवाड यांना जातिवाचक बोलून तलाठी कार्यालयातील कागदपत्रे फेकून देऊन रागाने बोलून दरवाजात जाऊन शिवीगाळ, दमदाटी करून, ‘यांची बादलीच करतो,’ असे म्हणून ते निघून गेले. या प्रकाराबाबत तलाठी गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल केला. याबाबतचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी व पोलिस हवालदार चंद्रकांत काळे हे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT