पुणे

अफरातफरीमध्ये संबंध नसल्याचा पाबळच्या माजी सरपंचांचा खुलासा

CD

शिक्रापूर, ता. ३ : पाबळ (ता. शिरूर) येथील १४ लाखांच्या अफरातफरीबाबत आपला तत्कालीन सरपंच म्हणून कुठलाच संबंध नसून, आपल्या सरपंच कार्यकालात सदर निधी खर्च झालेला नाही. याबाबत आपण सर्व ग्रामपंचायत खर्च तपशील, बॅंक डिटेल्स व आपल्या कार्यकालातील सर्व जमा-खर्च गटविकास अधिकारी यांना लवकरच सादर करत असल्याचा खुलासा माजी सरपंच पल्लवी डहाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.
पाबळ ग्रामपंचायतीकडे जमा झालेल्या पिंपळवाडी जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांसाठीच्या १४ लाखांच्या निधीचा पाबळ गावठाणातील स्मशानभूमीसाठी खर्च झाल्याचा आरोप झाल्याने शिरूर पंचायत समितीने तत्कालीन सरपंच पल्लवी डहाळे व तत्कालीन प्रशासक, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्या तिघांची चौकशी करून तिघांवर १४ लाखांची जबाबदारी निश्चित केली आहे. या प्रकरणाबाबत डहाळे यांनी ग्रामपंचायतीकडून त्यांच्या सरपंच कार्यकाळातील सर्व जमा-खर्च, बॅंक व्यवहार यांची लेखी माहिती संकलित केली व आपला खुलासा केला. या वेळी सरपंच सचिन वाबळे, माजी सरपंच सोपान जाधव, मारुती शेळके, माजी उपसरपंच संजय चौधरी आदी उपस्थित होते.
दरम्यान, डहाळे यांची बाजू ऐकली जाईल, असे शिरूर पंचायत समितीकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT