शिक्रापूर, ता. २१ : बारावीच्या परीक्षेत शिरूर तालुक्यातील १३ कनिष्ठ महाविद्यालयांचा इयत्ता बारावीचा निकाल १०० टक्के लागला. एकूण ५ हजार ७३२ परीक्षार्थींपैकी ५ हजार ७०६ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तालुक्याचा एकूण निकाल ९८.८६ टक्के एवढा लागला.
शिरूर तालुक्यात एकूण ४१ कनिष्ठ महाविद्यालयांतून ५७३२ विद्यार्थी यावर्षी इयत्ता बारावी परीक्षेसाठी बसले होते. यातील २६ विद्यार्थी वगळता उर्वरित सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तब्बल ४५२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी व संगणक विषयांना एकत्रित करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कुवतीनुसार पर्याय देणाऱ्या शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील छत्रपती संभाजीराजे महाविद्यालयाचा यावर्षीचा निकाल ९९.४३ टक्के लागला.
शिरूरमधील सर्व महाविद्यालयांचे कंसात गावे व टक्केवारीसह निकाल पुढीलप्रमाणे- श्री. वसंतराव डावखरे मेमोरिअल कॉलेज पिंपळे जगताप (९९.५६), श्री संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्य विद्यालय जातेगाव बुद्रुक (९९.४३), ज्ञानगंगा विश्व विद्यालय शिरूर (९९.२९), ग्लोरी ज्युनिअर कॉलेज कोरेगाव (९८.४१), श्रीदत्त उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड (९८.६८), शं. बा. डावखरे विद्यालय पिंपळे हिवरे (९७.८७), भैरवनाथ विद्यालय आलेगाव पागा (९७.९७), श्री भैरवनाथ ज्युनिअर कॉलेज पाबळ (९७.३६), आर. बी. गुजर ज्युनिअर कॉलेज तळेगाव ढमढेरे (९७.१९), विद्याधाम प्रशाला शिक्रापूर (९६.८), न्यू इंग्लिश स्कूल शिरूर (९६.९६), (९६.२५), श्री महागणपती ज्युनिअर कॉलेज, रांजणगाव, श्री छत्रपती संभाजी ज्युनिअर कॉलेज, कोरेगाव भीमा (९६.४२), आदर्श विद्यालय (९५.३३), विद्यानिकेतन कोंढापुरी (९४.०४), गायकवाड ज्युनिअर कॉलेज कासारी (९३.८०), वाघेश्वर विद्याधाम मांडवगण (९३.३३), बापूसाहेब गावडे कॉलेज टाकळी हाजी(९२.७०), सरदार ढवळे ज्युनिअर कॉलेज केंदूर (९१.६६), कान्हूर मेसाई (९१.०७), छत्रपती ज्युनिअर कॉलेज वडगाव रासई (८८.५७), विजयमाला ज्युनिअर कॉलेज शिरूर (८९.८८), सूर्यकांत पलांडे ज्युनिअर कॉलेज शिरूर (८८.५७), समाजभूषण संभाजीराव भुजबळ कॉलेज तळेगाव (८७.८७), विद्याधाम, न्यू इंग्लिश स्कूल मलठण (८०.६४), विद्या विकास मंदिर, निमगाव म्हाळुंगी (७९.३१), न्यू इंग्लिश स्कूल कवठे यमाई (७८.५७).
१०० टक्के निकाल लागलेली १३ महाविद्यालये- माध्यमिक व उच्च माध्य विद्यालय (सणसवाडी), कै. रा. गे. पलांडे कनिष्ठ महाविद्यालय (मुखई), विद्या विकास मंदिर (करंदी), अजिंक्यतारा ज्युनिअर कॉलेज (शिक्रापूर), विद्याधाम प्रशाला (शिरूर), मल्लिकार्जुन विद्यालय (न्हावरे), भैरवनाथ कनिष्ठ महाविद्यालय (करडे), कालिकामाता विद्यालय (वाघाळे), श्री गुरुदेव दत्त विद्यालय (सविंदणे), न्यू इंग्लिश स्कूल (शिरूर), कारेश्वर इंग्लिश मीडियम कनिष्ठ महाविद्यालय (कारेगाव), ज्ञानवर्धिनी विद्या मंदिर (शिरूर), आर. एम. धारीवाल ज्युनिअर कॉलेज (शिरूर).
SUR24B03753
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.