पुणे

न्यायालयाने फेटाळला जातेगावच्या आरोपीचा जामिन

CD

शिक्रापूर, ता. ११ : दोन वर्षांपूर्वी कौटुंबिक कार्यक्रमांना हजर न राहिल्याच्या कारणाने पत्नीचा खून केलेल्या जातेगाव खुर्द (ता.शिरूर)येथील सचिन दत्तात्रेय खंडाळे (वय ४२) याचा पुणे सत्र न्यायालयाने नुकताच जामिन फेटाळला. सदर खटला पुणे सत्र न्यायालयात सुरू असून आरोपीच्या नावावर अन्य कुठलाही गुन्हा नसून सदर प्रकरणी प्रत्यक्ष दर्शनी साक्षीदार नसल्याने आरोपीची न्यायालयाच्या अटीशर्थीनुसार जामिनावर मुक्तता करण्याची विनंती आरोपींच्या वकीलांनी केली होती.

२ ऑगस्ट २०२२ रोजी जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथील नातेवाइकांच्या एका धार्मिक कार्यक्रमांना तुम्ही का आला नाहीत हे विचारले म्हणून आरोपी सचिन खंडाळे याने त्याची पत्नी रूपाली सचिन खंडाळे (वय ३२) हीचा खून केल्याच्या आरोपावरून त्याला अटक असून या खटल्याची सुनावणी पुणे सत्र न्यायालयात सुरू असतानाच आरोपीचे वतीने अटीशर्थीनुसार जामिनावर मुक्तता करण्याची विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने सदर जामिन फेटाळला. या प्रकरणात मुळ फिर्यादी मयत रूपाली यांचे बंधू ललित गावडे यांच्या वतीने अ‍ॅड. दर्शन बढे व अ‍ॅड. मंदार देशमाने पुराव्यांसोबत छेडछाड व साथीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होवू शकतो हे कारण सांगितल्याने न्यायालयाने प्रस्तुत आरोपीचा जामिन फेटाळल्याची माहिती अ‍ॅड.बढे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT