शिक्रापूर, ता. ४ : हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथे दुचाकीचा धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून एकाला लोखंडी गजाने मारहाण करत जखमी केले. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात आदेश धनाजी ढोकले (रा. पिंपळे खालसा, ता. शिरूर) व तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
हिवरे कुंभार येथील निसर्ग हॉटेलमध्ये रमेश भानुदास धुमाळ (वय ४०, रा. पिंपळे खालसा, ता. शिरूर) हे बुधवारी (ता. २) जेवण करण्यासाठी आले होते. जेवण करून घरी जात असताना त्यांनी आपली दुचाकी चालू केली. यावेळी रमेश यांचा शेजारीच उभ्या असलेल्या आदेश याला धक्का लागला. सुरुवातीला किरकोळ भांडण असलेल्या या घटनेनंतर आदेश याने आणखी तिघा अनोळखी व्यक्तींसोबत रमेश यांना शिवीगाळ, दमदाटी करायला सुरुवात केली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर या चौघांनी लोखंडी गजाने रमेश यांना मारहाण करत जखमी केले. याबाबत रमेश यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आदेश याच्यासह तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल केले. याबाबतचा पुढील तपास पोलिस हवालदार नरेंद्र गायकवाड हे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.