पुणे

इडी जप्त करणार ८५ कोटींची संपत्ती

CD

शिक्रापूर, ता. १७ : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्यासह अन्य दोघांना सक्तवसूली संचालनालयाने (इडी) ८५ कोटींच्या मालमत्तेसंबंधित जप्तीची नोटीस बजावली आहे. पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील या मालमत्ता असून, बांदलांव्यतिरिक्त शिवाजीराव भोसले सहकारी बँकेशी संबंधित हनुमंत संभाजी खेमढरे व सतीश यतिश जाधव हे दोघे असल्याचीही माहिती पुढे आली आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील आर्थिक घोटाळा आणि त्याच अनुषंगाने बेकायदा आर्थिक व्यवहारप्रकरणी माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर (ता. शिरूर) आणि महंमदवाडी (हडपसर, पुणे) येथील निवासस्थानी इडीने २१ ऑगस्टला छापे टाकले होते. या वेळी इडीकडून बांदल यांच्या निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ताब्यात घेतली होती. या शिवाय बांदल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांचीही माहिती इडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती. संपूर्ण दिवसभर ही कारवाई करून बांदल यांना अटक करण्यात आली होती. त्यांना अद्यापि इडीच कोर्टाकडून जामिन मंजूर झालेला नाही. त्यातच बुधवारी (ता. १६) इडीने बांदल यांच्यासह शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेशी संबंधित हनुमंत संभाजी खेमढरे व सतीश यतिश जाधव यांच्या पुणे, सोलापूर व अहिल्यानगर येथील मालमत्ता जप्त करण्यासाठीच्या नोटिसा बजावल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार कालच्या कारवाईत केवळ नोटिसा बजावण्यात आल्या असून, कुठलीही जप्तीची कारवाई केलेली नाही. दरम्यान, वरील जप्तीची नोटीस इडीकडून बजावली गेल्याच्या माहितीला बांदल यांच्याशी संबंधितांनी दुजोरा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jensen Huang: खुर्ची गेली, चौकशी सुरू झाली; तरी जेन्सेन हुआंग यांचे Nvidia मध्ये जोरदार कमबॅक!

Pune Crime Ladki Bahin Scam : 'लाडकी बहीण' योजनेच्या बहाण्याने घरात शिरली; मालिश करण्याच्या बहाण्याने सोनसाखळी चोरली!

JDU vs PK: 'प्रशांत किशोर राजकीय संन्यास कधी घेणार?' टीका जिव्हारी लागल्याने जेडीयूचा तिळपापड; नेमका वाद काय?

Pune News : जिल्हा न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी! धमकीचा ई-मेल मिळताच न्यायालय रिकामे; तपासणीनंतर साडेचारला कामकाज सुरू

ST Bus Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, एक महिला जखमी

SCROLL FOR NEXT