शिक्रापूर, ता.१९ : आंबेगाव-शिरूर व शिरूर-हवेली या दोन्ही विधानसभा मतदारसंघात विभागालेल्या शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत उद्याच्या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी १० अधिकारी, १५० पोलिस कर्मचारी आणि १०० होमगार्डची नियुक्ती केली आहे. कुठल्याही अनुचित प्रकाराचा तत्काळ बंदोबस्त करण्यासाठी शिघ्रकृती दलाच्या १० तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली.
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील १५ गावे आणि शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील २१ गावे अशी एकूण ३६ गावे शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असून, दोन्ही मतदार संघातील एकूण १० गावे अतिसंवेदनशील म्हणून विशेष निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेली आहेत. यातील शिरूर-आंबेगाव मधील केंदूर, पाबळ, करंदी, कान्हुर-मेसाई, हिवरे ही पाच तर शिरूर-हवेलीतील शिक्रापूर, सणसवाडी, तळेगाव-ढमढेरे, कोंढापुरी, कोरेगाव-भीमा आदी पाच गावे अतिसंवेदनशील असल्याने या गावांतील प्रत्येक घडामोडींवर शिक्रापूर पोलिस विशेष लक्ष ठेवून आहेत. वरील सर्व गावांपैकी प्रत्येक तीन गावांसाठी एक स्वतंत्र बंदोबस्त गाडी, १ अधिकारी असे नियोजन असून आंबेगाव-शिरूरमधील १५ गावांसाठी ४ अधिकारी, ५० अंमलदार (पोलिस कर्मचारी), ३० होमगार्ड बंदोबस्तासाठी नियुक्त केले असून शिरूर-हवेलीतील २१ गावांसाठी ६ अधिकारी, १०० पोलिस कर्मचारी आणि ७०होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
समाज माध्यमांवर सायबर विभाग लक्ष
सर्व संवेदनशील गावांत पोलिस संचलन झालेले असून, समाज माध्यमांवर सक्रिय असलेले प्रत्येक गावातील सर्व व्हॉट्सअप ग्रुप व इतर समाज माध्यमांवर जिल्हा पोलिस दलाचा सायबर विभाग लक्ष ठेवून आहे. निवडणुकीच्या काळात प्रत्यक्ष वा समाज माध्यमांवर कुठलाही अनुचित प्रकार केल्यास त्याची गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिला आहे. शीघ्र कृती दलाच्या १० तुकड्या हद्दीतील कुठल्याही गावात केवळ दहाच मिनिटात पोचतील, अशी व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.
04216
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.