शिक्रापूर, ता. ७ ः घर गहाण ठेवूनही कर्ज न देताही कर्ज हप्त्यांच्या तगाद्याने तळेगाव-ढमढेरे (ता.शिरूर) येथील हरिभाऊ रघुनाथ गायकवाड यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी शिक्रापुरातील महिंद्रा फायनान्स कंपनीचे सूरज पवार व महेंद्र पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. याबाबत शीतल हरिभाऊ गायकवाड (वय ४३, रा. तळेगाव ढमढेरे) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील हरिभाऊ गायकवाड यांनी व्यवसायासाठी २०१८ मध्ये शिक्रापूर येथील महिंद्रा फायनान्स कंपनीच्या शाखेकडे पाच लाख रुपयांची कर्ज मागणी केली. शिक्रापूर शाखेतील सूरज दिलीप पवार व महेंद्र पाटील यांनी गायकवाड यांचेशी चर्चा करून ‘फायनान्स करू, त्यासाठी गहाण म्हणून घर, शेती जे काही असेल ते द्यावे लागेल.’ यावरून गायकवाड यांनी राहत्या घराची सर्व कागदपत्रे देत महिंद्रा फायनान्सच्या नावाने घराचे गहाणखत केले. पुढील काळात महिंद्रा फायनान्स कंपनीने काही हप्ते भरण्यास सांगितल्यावरून त्यांनी काही हप्तेही भरले. मात्र, त्यांना मंजूर केलेल्या कर्जाच्या रकमेचा धनादेश देण्यास कंपनी टाळू लागली. या प्रकारामुळे गायकवाड हतबल झाले होते. गायकवाड यांनी महिंद्रा फायनान्सचे पुणे येथील कार्यालय गाठले. पुणे कार्यालयात त्यांना ‘तुम्हाला काय करायचे ते करा, कर्जाचा धनादेश आम्ही देणार नाही,’ असे सांगितले. कर्ज राहू दे ‘गहाणखत तरी रद्द करा,’ असे गायकवाड यांनी सांगितले. त्यावर ‘अरेरावी आणि तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही कर्जधनादेश देणार नाही. गहाणखतही बदलणार नाही’, असे थेटच सांगितले. या सर्व प्रकारामुळे गायकवाड यांनी आत्महत्या केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.