शिक्रापूर, ता.२२ : कासारी फाटा (ता.शिरूर) येथे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर ट्रकला मागून धडकलेल्या नवनाथ चौधरी (वय ३०, सध्या रा.कोंढापुरी, ता.शिरूर, मूळ रा. धामणगाव पाट, ता.अकोले, जि.अहिल्यानगर) या दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (ता.२२) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारी फाटा येथून एकनाथ चव्हाण हे ट्रक (एम एच ४२ बी ८०४१) घेऊन पुणे बाजूने अहिल्यानगरच्या दिशेने निघाले होते. यावेळी पाठीमागून पुणे बाजूने दुचाकी (एम एच २४ जि ५३३२) ट्रकला ओव्हरटेक करून पुढे निघण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, यावेळी दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो सरळ चव्हाण यांच्या ट्रकला जोरात धडकला व यामुळे नवनाथ याचा मृत्यू झाला. अपघाताबाबत ट्रकचालक चव्हाण (वय ३१, सध्या रा.निमोणे, ता.शिरूर, मूळ रा.पाचलेगाव, ता.जिंतूर, जि.परभणी) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात येथे फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस हवालदार बापू हाडगळे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.