पुणे

वेश्या व्यवसायप्रकरणी शिक्रापुरात कारवाई

CD

शिक्रापूर, ता. ४ : पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाबळ चौकात असलेल्या एका लॉजवर सुरू असलेल्या बेकायदा वेश्या व्यवसायप्रकरणी वेश्या व्यवसाय करणारी संबंधित महिला व राकेश नामक एका व्यक्तीस ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, शिक्रापूर येथील पाबळ चौक परिसरातील ऐश्वर्या लॉजवर एक व्यक्ती एका महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांना एका गोपनीय स्रोतांकडून मिळाली. त्यावर पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलिस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, रोहिदास पारखे, विकास पाटील, महिला पोलिस शिपाई रूपाली खोटे यांच्या पथकाने या ठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवून पाहणी केली असता एक महिला वेश्याव्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. स्थानिक पंचासमक्ष पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेत कारवाई केली. याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार श्रीमंत सर्जेराव होनमाने (रा. शिक्रापूर) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या राकेश (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्यासह संबंधित महिलेवर बेकायदा वेश्या व्यवसाय केल्याचा गुन्हा दाखल केला. संबंधित महिलेची रवानगी पुण्यातील महिला सुधारगृहात केली. शिक्रापूर हद्दीत कुठेही बेकायदा वेश्या व्यवसाय चालू देणार नसल्याचाही पुनरुच्चार पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी बोलून दाखविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

भारताच्या प्रगतीचं पाककडून कौतुक! भारत खूप पुढे गेलाय आम्ही मागे आहोत...पाकिस्तानी मंत्र्यांची स्पष्ट कबुली

मुंबईकरांसाठी दिलासा! ११ किमीचा सिग्नल-फ्री कॉरिडोर तयार; ट्रॅफिकमधून सुटका होणार, मार्ग कुठून कुठे असणार?

Latest Marathi News Live Update : नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांचा दौरा; मेयो रुग्णालयासह विकासकामांची पाहणी

SCROLL FOR NEXT