पुणे

सणसवाडीत दोन रानगव्यांमुळे ग्रामस्थांची पळापळ

CD

सणसवाडी, ता. ८ : उद्योगनगरी सणसवाडीत (ता.शिरूर) बुधवारी (ता.७) दोन रानगवे लोकवस्तीत घुसले. यामुळे ग्रामस्थांना चांगलीच पळापळ करावी लागली. वनविभागाला याबाबत त्वरित कळविल्याने पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. पोलिस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना हे गवे पुन्हा वनविभाग क्षेत्रात हुसकून लावण्यात यश आले.
सणसवाडी (ता.शिरूर) येथे सोमवारी (ता.५) दोन भलेमोठे रानगवे आढळून आले. काही वेळ नागरीवस्तीत त्यांचा विहार राहिल्यानंतर ते पुन्हा गायब झाले. मात्र, बुधवारी (ता.७) पुन्हा सकाळच्याच सुमारास अचानकपणे थेट पुणे-अहिल्यानगर महामार्गालगतच्या नागरी वस्तीतच ते फिरू लागल्याने स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गव्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी केली. गर्दीच्या गोंगाटामुळे दोन्ही रानगवे घाबरून सैरभैर होऊन पळू लागले. यामुळे नागरिकांचीही पळापळ झाली. याबाबत स्थानिकांनी शिक्रापूर पोलिसांना तसेच शिरूर वनविभागाला सदर माहिती देताच वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, वनपाल गौरी हिंगणे, वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, वनविभाग रेस्क्यू टीम मेंबर व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, अमोल कुसाळकर, शुभम वाघ, नेचर गार्ड ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष गणेश टिळेकर, शुभांगी टिळेकर, बाळासाहेब मोरे, वैभव निकाळजे, श्रीकांत भाडळे, राहुल गायकवाड यांनी एकत्रितपणे रानगवे असलेल्या परिसरात तातडीने धाव घेतली.
यावेळी पोलिस हवालदार उद्धव भालेराव, दामोदर होळकर, वॉर्डन बाळासाहेब शेलार यांच्यासह स्थानिकांच्या मदतीने पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली. नागरी वस्तीतील दोन्ही रानगवे जवळच असलेल्या गवे वनविभागाच्या जंगली भागात नेण्यात सर्वांना यश आले.

04694

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi News : 'या' पाच मार्गांनी करण्यात आली मतांची चोरी! राहुल गांधींनी पुराव्यासह निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह...

Imtiaz Jaleel: ''माझ्या मतदारसंघातला निवडणूक अधिकारी नंतर ओएसडी झाला'', राहुल गांधींनंतर इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

Deepak Pawar: अब्दालीपासून देश वाचवला; मराठ्यांचे कुणी आभार मानले का? दीपक पवारांचा निशाणा कुणावर?

Latest Maharashtra News Updates: किल्ले रायगडच्या पायरी मार्गावरील संरक्षण भिंत कोसळली

Kabutarkhana High Court decision: मोठी बातमी! कबुतरांना अन्न-पाणी देण्याची बंदी उच्च न्यायालयाने ठेवली कायम

SCROLL FOR NEXT