शिक्रापूर, ता.२३ : शिक्रापूर परिसरातील वाहतूक प्रश्नी राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, पुणे जिल्हा परिषद, महामार्ग पोलिस, शिक्रापूर व सणसवाडी ग्रामपंचायत यांना तत्काळ पत्रव्यवहार करून एकत्रित बैठक घेण्याचे नियोजन करीत आहोत. ठोस कार्यवाहीशिवाय हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने याबाबत पुढाकार घेत असल्याचे शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितले.
शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांनी शिक्रापूर वाहतूक नियंत्रणासाठी आणखी वॉर्डन देण्याची तयारी दर्शविली असून, राष्ट्रीय महामार्ग विभागासह बांधकाम खात्याच्या बेपर्वाईचा निषेध करीत सर्व संबंधित खात्यांची एकत्रित बैठक घेऊन ठोस कार्यवाहीची मागणीही त्यांनी सकाळशी बोलताना केली.
पुणे-अहिल्यानगर महामार्गामुळे आमच्या गावची अर्थव्यवस्था तालुक्यात मोठ्या उलाढालीची आहे. मात्र येथील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांमुळे आम्हीही हैराण आहोत. शिक्रापूर पोलिसांच्या सूचनेनुसार एक पगारी ट्रॉफिक वॉर्डन आम्ही इथे नेमलेला आहे. मात्र आणखी वॉर्डन नेमण्यासाठी मासिक सभेत ठराव घेऊन निर्णय घेवू. मात्र याबाबत शासनाच्या सर्व संबंधित खात्यांनी तत्काळ बैठक घेऊन निर्णय घेण्याची सूचना येथील सरपंच रमेश गडदे व उपसरपंच वंदना भुजबळ यांनी केली.
शिक्रापूरचा वाहतूक कोंडीचा प्रश्नाबाबत शुक्रवारी (ता.२३) प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर बोलताना सरपंच रमेश गडदे यांनी स्वत:हून सांगितले की, पोलिसांनंतर ग्रामपंचायत म्हणून आमच्यावरच या प्रश्नाचे खापर फोडले जाते. मात्र वस्तुत: महामार्गावर होणाऱ्या अतिक्रमणांना आम्ही जबाबदार नाही. रस्त्यावर थांबणाऱ्या बेशिस्त मोठ्या गाड्यांच्या पार्किंगला आम्ही जबाबदार नाही. शिवाय संपूर्ण महामार्गावरील ड्रेनेज लाईन इतकी वाईट स्थितीची आहे.
बेजबाबदार बांधकाम खाते, महामार्ग पोलिस यंत्रणा
जिल्ह्यातील सर्व महामार्गांवरील वाहतूक नियंत्रण याबाबत महामार्ग पोलिस ही स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र, हे पोलिस शिक्रापूरसह पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कधी येतात हे स्थानिकांना सोडा शिक्रापूर पोलिसांसह ट्रॅफिक बंदोबस्तासाठी असलेल्या जिल्हा पोलिसांनाही ठाऊक नसते. या शिवाय महामार्गावरील दुरुस्ती, अतिक्रमणे, वाहतूक कोंडींबाबत उपाययोजना यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यासह राष्ट्रीय महामार्ग विभागाची जबाबदारी आहे. इथे मात्र दोन्ही खाती गायब असून नेमका कुणाला संपर्क करावा याबाबतही कुणाही सामान्य नागरिकांना समजत नसल्याने दोहोंबाबत संपूर्ण शिक्रापूरकर आणि महामार्गावर प्रचंड संताप व्यक्त होतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.