शिक्रापूर, ता.२७ : शिक्रापूरपासून चार किलोमीटरवर असलेल्या जातेगाव खुर्द व जातेगाव बुद्रुक यांना जोडणाऱ्या वेळनदीला पूर आला. त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला. पुणे-अहिल्यानगर महामार्गावरून जाणारी अतिरिक्त वाहतूक या रस्त्याने होत असल्याने तो सर्व वाहनांचा ताफाच आता शिक्रापुरात अडकून शिक्रापूरातील वाहतूक कोंडी होत आहे.
जातेगाव खुर्द व जातेगाव बुद्रुक ही दोन्ही गावे वेळनदीच्या तिरावर व वेळनदी हीच दोन्ही गावांची हद्द. याच दोन्ही गावांच्या मधून वाहणाऱ्या वेळनदीवर जो छोटा पूल आहे. तो आज गेल्या तीन-चार दिवसांच्या संततधार पावसाने पूर्ण पाण्याखाली गेला आहे. सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवासासाठी तो धोकादायक झाला आहे. पर्यायाने दोन्ही गावांचा संपर्कच तुटला आहे. सध्या शिक्रापुरात वाहतूक कोंडीचा जो प्रश्न गंभीर बनला आहे तेथील अतिरिक्त वाहने वाहतूक कोंडीमुळे कासारी फाटा, वाबळेवाडी, जातेगाव बुद्रुक मार्गे जातेगाव खुर्द वरून थेट शिक्रापूर-चाकण रोडला येत होती. त्यामुळे शिरुरकडून येणाऱ्या वाहनांसाठी चाकणकडे जायला हा मार्ग अत्यंत चांगला, जवळचा व सोपा होता. मात्र वेळ नदीला आलेल्या पुरामुळे व येथील फूल पाण्याखाली गेल्याने सर्व प्रकारच्या वाहनांची मोठी अडचण झाली.
जातेगावांना जोडणारा पुलाची मागणी
पुलावरील वाढलेली वाहतूक ही शिक्रापूरातील अतिरिक्त वाहतूक असून शिक्रापुरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल गरजेचा आहे. त्यामुळे सध्या पाण्याखाली गेलेला पूल चांगली उंची वाढवून नव्याने तो बांधून दोन्ही गावांसह या परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठीच्या या कामाची मागणी आपण तत्काळ ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करीत असून याचा पाठपुरावाही आपण करणार असल्याचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी सांगितले.
04752
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.