पुणे

शिक्रापूरमध्ये २८ जनावरांसह चारचाकी जप्त

CD

शिक्रापूर, ता. १८ : येथील चाकण-शिक्रापूर रस्त्याने कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर शिक्रापूर पोलिसांनी जप्त करीत अठ्ठावीस लहान-मोठ्या म्हशी ताब्यात घेतल्या आणि त्यांची रवानगी गोशाळेत केली. या कारवाईत मोहम्मद अबरार अली मोहम्मद पठाण व रफिक टीसुल शेख या दोघांना अटक केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
चाकण-शिक्रापूर रस्त्याने एका कंटेनर मधून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना एकाने कळविली. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून संशयास्पद कंटेनर (एम एच ०३ ई एस ३३९२) ताब्यात घेतला. सदर कंटेनर पकडून देण्यात गोरक्षक विकास सपकाळ, गोपाल अपार, गणेश तार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कंटेनरची पोलिसांनी पाहणी केली असता, कंटेनरमध्ये तेरा रेडे, तीन मोठ्या तर बारा लहान म्हशी दाटीवाटीने, कोणत्याही चारा पाण्याची व्यवस्था न करता कोंबल्या होत्या. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता, त्याने सर्व जनावरे कत्तलीसाठी मुंबई येथे घेऊन जात असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी कंटेनरसह कंटेनर चालक आणि वाहकाला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी कंटेनर मधील अठ्ठावीस लहान मोठ्या म्हशी गोशाळेत जमा केल्या असून याबाबत पोलिस हवालदार शरद कारकूड (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने मोहम्मद अबरार अली मोहम्मद पठाण (वय ३५) व रफिक टीसुल शेख (वय ६०, दोघेही रा. लोहार चाळ, इंदिरानगर, शिवाजीनगर, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Warning Nishikant Dubey: ‘’दुबे तुम मुंबई मै आजाओ.., समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें...’’ ; राज ठाकरेंचा कडक पलटवार!

Sangli Poisoning : कर्जबाजारी कुटुंबाने उचलेले टोकाचे पाऊल! विषप्राशनाने सासू-सुनेचा मृत्यू, वडीलांसह मुलाची प्रकृती गंभीर

Latest Marathi News Updates: राजकीय पक्षांच्या दबावापोटी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला - राज ठाकरे

सायलीने गड राखला पण TRP मध्ये 'येड लागलं प्रेमाचं' ने मारली बाजी; झी मराठीच्या 'कमळी'ने सगळ्यांना टाकलं मागे, वाचा संपूर्ण रिपोर्ट

JJ Hospital Case: धक्कादायक! जेजे रुग्णालयात विद्यार्थिनीचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, संतापजन कारण समोर

SCROLL FOR NEXT