पुणे

शिक्रापूर, सणसवाडीत लॉजवर वेश्‍या व्यवसायप्रकरणी कारवाई

CD

शिक्रापूर, ता. ४ : जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासह शिक्रापूर पोलिसांनी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर व सणसवाडी येथील दोन हॉटेलवर (लॉजे) छापा टाकत वेश्या व्यवसाय करणाऱ्या नऊ महिलांची सुटका केली. या छाप्यातील चौघांवर अनैतिक मानवी व्यापार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथील पाबळ चौकातील शारदा आणि सणसवाडी येथील साई लॉजिंग येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी आल्यावरून शिक्रापूर पोलिसांनी संयुक्त धाडी टाकल्या. यात सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख, पोलिस हवालदार रोहिदास पारखे, पोलिस शिपाई शरद कारकूड, महिला पोलिस शिपाई अस्मिता जोंधळे यांनी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकले. यावेळी शिक्रापुरातील शारदा हॉटेलमध्ये चालक पाच महिलांना हॉटेलमध्ये ठेवून वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे दिसून आले. या कारवाईत सदर इसमासह पाच महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस शिपाई शरद वाल्मीक कारकूड (रा. शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी हॉटेल चालक संतोष सीना पुजारी (वय ३७, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करत सापडलेल्या पाचही महिलांची रवानगी महिला सुधारगृहात केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख हे करत आहेत.
दुसऱ्या कारवाईत सणसवाडी येथील साई लॉजिंग २४-७ येथे वरीलप्रमाणेच गुप्त माहितीनुसार शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. यात हॉटेलचालक उमेश बिन्शुधारी यादव (वय ३५, रा. सणसवाडी, मुळ रा. हडियादाग, फत्तेपूर, बिहार) व हॉटेल व्यवस्थापक आझाद कल्लू केवट (वय २४, शिंदवणे रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) या दोघांवर गुन्हे दाखल केले. या कारवाईत आढळलेल्या चार महिलांची रवानगी महिला सुधारगृहात केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

जागा मालकावर गुन्हे दाखल करणार
गेल्या वर्षभरात नऊ कारवाया थेट हॉटेल-लॉज जाग-बिल्डींग मालकांवर करूनही पुन्हा-पुन्हा असे प्रकार शिक्रापूर हद्दीत होत आहेत. वरील प्रकरणातही जागा-बिल्डींग मालकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. या पुढील काळात असे गैरप्रकार जिथे होतील तेथील हॉटेल-लॉज यांच्या मालकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी दिला. तसेच, याबाबत आता स्थानिकांनी सजग राहून पोलिसांना अशा प्रकाराची माहिती कळविण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Sant Tukaram Maharaj Beej 2026: संत तुकाराम बीज का साजरी केली जाते अन् तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहित आहे का?

Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

Latest Marathi News Live Update : एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार

SCROLL FOR NEXT