पुणे

निसर्ग वन्यजीव संस्था ''उत्कृष्ट''

CD

शिक्रापूर, ता. १२ : शिक्रापूर आणि परिसरातील पशू-पक्षांच्या रक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेला या क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाची दखल घेऊन संस्थेला मावळ येथील पुणे वनविभाग व वन्यजीव रक्षक संस्थेच्या वतीने उत्कृष्ट संस्था पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
शिक्रापूर आणि परिसरातील पशू-पक्ष्यांच्या संवर्धन व रक्षणासाठी येथील युवकांनी मिळून निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्था काही वर्षांपूर्वी स्थापन केली. संस्थेकडून आत्तापर्यंत अनेक साप, नाग तथा मुके रानटी प्राणी निसर्गात मुक्त केले असून कित्येक बिबट बछडे, कोल्हे यांसह पशू-पक्ष्यांचे त्यांच्या कुटुंबात पुनर्मिलन करून पशू पक्षांच्या संवर्धनासाठी जनजागृती केली आहे. निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या कार्याची दखल घेत पुणे वनविभाग, वन्यजीव रक्षक संस्था मावळ, माझी वसुंधरा अभियान, रोटरी क्लब ऑफ गोल्डन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ सर्पतज्ज्ञ निलीमकुमार खैरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी ममता राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, माजी नगरसेवक संतोष दाभाडे, मावळ येथील वन्यजीव रक्षक संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे व अध्यक्ष अनिल आंद्रे यांच्या हस्ते उत्कृष्ट संस्था पुरस्काराने सन्मानित केले. संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, सचिव अमर गोडांबे, संचालक राहुल त्रिकुटे, अल्ताफ सय्यद, सर्पमित्र अमोल डाडर, आकाश पारडे, हेमंत परदेशी, नरेश बाविस्कर, अमोल कुसाळकर, शुभम वाघ, राहुल शेजवळ, आदिनाथ चव्हाण, बाळासाहेब मोरे, विष्णू हक्के, मनोज थोरात, हेमंत उगले, वैभव निकाळजे, नितीन शेलकर आदींनी हा पुरस्कार सामुहिक पद्धतीने स्वीकारला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, श्रीफळ असे स्वरूप असलेला हा पुरस्कार संस्थेच्या सर्व सभासदांनी एकत्रित स्वीकारला. यावेळी सेवानिवृत्त वनाधिकारी संजय मारणे, नरेंद्र पाटील, राहुल काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: धक्कादायक! विमानतळावर होमगार्डनं जीवन संपवलं; एटीसी परिसरात फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

US Dollars to INR : जर अमेरिकेतून तुम्ही एक लाख डॉलर आणले, तर भारतात तुमच्या खात्यात एकूण रक्कम...!

Dussehra Melava 2025 Live Update: पाच वर्षांचा शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल

Kantara 2 Twitter Review: कसा आहे रिषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १'? ट्विटर रिव्ह्यू वाचून लगेच कळेल; नेटकरी म्हणतात-

IND vs WI, 1st Test: पायात क्रॅम्प, तरीही KL Rahul मैदानावर उभा राहिला; पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराहसह तोही चमकला

SCROLL FOR NEXT