पुणे

पगार मागितल्याने कामगाराला डांबून मारहाण

CD

शिक्रापूर, ता. ३० : कंपनीत काम केल्याचे पैसे मागितले म्हणून ठेकेदाराने कामगाराचा मोबाईल काढून घेतला, एका हॉटेलात बंद करून सलग दोन दिवस मारहाण केली आणि सोडण्यासाठी तब्बल ५७ हजारांची खंडणीही मागितली. जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथील या प्रकरणी किरण काटरनवरे (वय १८, रा. सांगवी खुर्द, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी चौघांवर खंडणी, अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून, सर्व आरोपींना अटक केली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, शिक्रापूर येथे कामानिमित्त राहणारा किरण कटारनवरे हा पगार करणाऱ्या ठेकेदार अशोक खामकर यांच्याकडे कामाचा पगार मागण्यासाठी गेला. त्यावेळी अशोक व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी किरण याला दुचाकीहून जातेगाव खुर्द येथील ‘हिंदवी हॉटेल’मध्ये नेले. तिथे त्याला सुनावले की, ‘तुझ्यामुळे आमचे दोन कामगार पळून गेले आहेत. त्यामुळे आम्ही तुझा पगार देणार नाही.’ तसेच, हे चौघेही यावरच थांबली नाहीत तर त्यांनी किरण याला हाताने, स्टीलच्या पाईपने मारहाण केली. शेवटी मारहाण करूनही हे तिघे थांबेनात म्हणून किरण याने न मारण्याची विनवणी केली. त्यावेळी या चौघांनी त्याच्याकडे तब्बल ५७ हजार रुपयांची मागणी केली. त्याला त्याच्या मोबाईलवरून जबरदस्तीने त्याच्या वडिलांना फोन करून पैसे आणण्यास सांगितले.
हा प्रकार तब्बल चार ते पाच तास सुरू होते. त्यानंतर रात्री त्याचे हात बांधून ठेवले व त्याला रात्रभर हॉटेलच्या खोलीत डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी पुन्हा या चौघांनी त्याला मारहाण करत पैशांची मागणी केली. त्यावेळी किरण याने त्याच्या दाजींना पैसे मागणी करताना वरील सर्व प्रकार मोठ्या चलाखीने सांगितला. यावर त्याच्या दाजींनी शिक्रापूर पोलिसांच्या मदतीने किरण याची हॉटेलमधून सुटला केली.
याबाबत किरण याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अश्रू ऊर्फ अशोक बाळासाहेब खामकर (वय ३१, रा. जेकटेवाडी, ता. परांडा, जि. धाराशिव), अनिकेत गोरख रोकडे (वय २१, रा. खडकी, ता. जि. अहिल्यानगर), विशाल राजेंद्र घोगरे (वय २५, सध्या रा. शिक्रापूर; मूळ रा. सुपे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), दिलीप सुभाष आहिरे (वय २६, सध्या रा. शिक्रापूर मूळ रा. तळवाडे, ता. सटाणा, जि. नाशिक) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांनाही तत्काळ अटक केली. या चौघांनाही शिरूर न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत (ता. २) चौघांनाही पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे व पोलिस नाईक प्रतीक जगताप करीत आहेत.

कंत्राटी कामगारांना पोलिसांचे आवाहन
शिरूर तालुक्यात सुमारे दीड हजार कंपन्या कार्यरत असून, त्यात मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार कामाला आहेत. या सर्वांचा थेट संबंध कंत्राटदाराशी येतो. मात्र, कंत्राटदारांकडून होत असलेली पिळवणूक सांगण्यासाठी त्यांना व्यासपीठ आढळत नाही. या पार्श्वभूमिवर हद्दीतील कोणाही कंत्राटी कामगारावर कोणी कंत्राटदार अन्याय करीत असेल, पगाराबाबत काही छळ करीत असेल तर त्यांनी तत्काळ शिक्रापूर पोलिसांशी (०२१३७-२८६३३३) संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCBला व्हावं लागणार पुणेकर? बंगळुरुतल्या चेंगराचेंगरीमुळे IPL 2026मध्ये मोठा निर्णय घेण्याची शक्यता....

Yamaha New Bike : एकच झलक, सबसे अलग! लाँच झाली Yamaha XSR155 सुपर बाइक; दमदार फीचर्स..अन् किंमत परवडेल अशी

Latest Marathi Breaking News : बोरीवलीत महिलेसोबत छेडछाड; आरोपी अटकेत

Kolhapur leopard: कोल्हापूरात बिबट्याचा थरार! दोन तासांच्या मोहिमेनंतर अखेर जेरबंद

Gadchiroli Crime: 'हरवलेले, चोरीला गेलेले ९० मोबाईल फोन शोधून काढले'; गडचिरोली पोलिसांची काैतुकास्पद दलाची कामगिरी..

SCROLL FOR NEXT