पुणे

संकटात धावणारा खरा देवमाणूस

CD

संकटात धावणारा
खरा देवमाणूस

दिलीप वळसे पाटील साहेबांनी तब्बल ३६ वर्षे आमदार म्हणून, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री म्हणून केलेला या भागाचा विकास, कोरोना महामारीत नागरिकांना केलेली मदत, आणि आता चालू असलेली पूरग्रस्तांसाठीची मदत, ऑगस्ट २०१९मध्ये कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी केलेली मदत, हे सर्व पाहता ते केवळ कार्यसम्राट, हृदयसम्राट नाहीत तर संकटात सापडलेल्यांसाठी ते जातीने मदत करणारा खरा देवमाणूस आहे. त्यांची कार्यपद्धती पाहता, तेच आपणा सर्वांसाठी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि सर्वकाही आहेत.

- सुभाष उमाप, विक्रमवीर पहिलवान, तथा मा. सभापती, शिरूर पंचायत समिती

राज्यातील अनेक भागात गेल्या सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. मराठवाडा, खानदेश, विदर्भ या भागातील शेती पुराच्या पाण्यात खरडून गेली. काढणीला आलेली पिके भुईसपाट झाली. जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. मनुष्यहानी झाली. कधी नव्हता एवढा प्रचंड पाऊस झाला. परिणामी, बळिराजा पुरता नेस्तनाबूत झाला आहे. पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले. पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू झाली. वेगवेगळ्या पातळीवर मदतही सुरू झाल्या. दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना यांनी माणुसकीच्या भावनेतून मदत कार्ये सुरू केली. अशाच काळात वळसे पाटील साहेबांनी आंबेगावकरांना मदतीसाठीचे आवाहन केले. साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक जण कामाला लागले. मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू झाला. जीवनावश्यक वस्तूंचे बॉक्स तयार करण्यात आले. कोटी-दोन कोटी रुपये जमा झाले आणि ६ तारखेला जीवनावश्यक वस्तूंचा पहिला ट्रक मंचरवरून साहेबांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांसाठी रवाना झाला. आता हे कार्य दीपावलीनंतरही सुरू राहील.
ही सर्व माहिती देण्याचे कारण असे की, नुकतेच वळसे पाटील साहेब हे पाबळ या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद सदस्या सविताताई एकनाथ बगाटे यांच्या घरी आले होते. सौ. ताईंचे पती आणि आमचे दाजी एकनाथ बगाटे सर यांच्या मातेच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने. कार्यक्रमानंतर थोडावेळ साहेब थांबले आणि कार्यकर्त्यांची विचारपूस करीत भूतकाळातील काही आठवणी त्यांनी जाग्या केल्या. माझ्यासाठी एवढ्या जवळून पहिल्यांदाच साहेबांचे विचार ऐकायला मिळाले. विशेषतः नैसर्गिक आपत्ती व त्यावरील उपाय या प्रश्नावर साहेब विस्ताराने बोलते झाले. काही प्रसंग ऐकताना मन सुन्न झालं. आपण काहीही घटना घडल्या की, लगेच राजकीय नेत्यांना, राज्यकर्त्यांना दोष देऊन मोकळे होतो आणि प्रशासनावरही कडक टीका करतो, पण मोठेपणाला किती कठीण यातना असतात, हे सांगताना त्यांचे मन गहिवरून आलेले मी यावेळी अनुभवले.
राज्याच्या मंत्रिमंडळात काम करताना मी अनेक प्रश्न मार्गी लावले, त्यासाठी जनतेने मला खूप मोठी साथ दिली, पण हे काम करताना माझ्या आयुष्यात घडलेल्या तीन घटना मी कधीच विसरू शकणार नाही, असे म्हणून साहेब पुढे बोलते झाले. त्यातील पहिली घटना, अहिल्यानगर- बीड सीमेवर १७ जानेवारी २००१ या दिवशी कोठेवाडी येथे मोठा दरोडा पडला होता. संपूर्ण गावाची लूट करून दरोडेखोरांनी महिलांवर अत्याचार केले होते. संपूर्ण राज्यात या घटनेने तीव्र संताप व्यक्त होत होता. संपूर्ण गाव भीतीच्या छायेत होते. चारही बाजूने डोंगर असल्याने गावातील भीती कशीच कमी होत नव्हती. साहेब पालकमंत्री असल्याने दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिस प्रशासन गतीने कामाला लागले होते. ग्रामस्थांनी व्यक्त केलेली भीती दूर करण्यासाठी साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्‍यांशी बोलून संपूर्ण गावच जवळच्याच एका उंच टेकडीवर बांधून देण्याचा निर्णय घेतला.
दुसरी घटना, २५ जानेवारी २००५ या दिवशी वाई (जि. सातारा) तालुक्यातील मांढरदेव यात्रेत चेंगराचेंगरी होऊन ३०६ लोक मृत्युमुखी पडले होते. त्यात महिला व लहान मुलांची संख्या मोठी होती. प्रचंड भीतीदायक असे ते चित्र होते. वळसे पाटील साहेब, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने ते तत्काळ घटनास्थळी हजर झाले. सर्वत्र प्रेतांचा खच पडला होता. काळीज पिळवटून टाकणारा तो प्रसंग सांगताना इकडे आमच्याकडे पुन्हा वातावरण सुन्न झाले होते. नातेवाईक मंडळी आपल्या माणसांना नेण्यासाठी येत होती. ओळख पटवून प्रेत घरी नेताना त्यांचा आक्रोश पाहवत नव्हता. ते
सर्व भयानक वातावरण पाहून ५ दिवस जेवण गेले नसल्याचे सांगताना साहेबांच्या डोळ्यातील वेदना आजही तितक्याच असह्य असल्याचे यावेळी आम्ही पाहिले.
तिसरा प्रसंग, ३० जुलै २०१४ या दिवशी आंबेगाव तालुक्यात प्रचंड पाऊस झाल्याने माळीण गावावर डोंगरकडा कोसळला. संपूर्ण गाव गाडले गेले, १५१ लोक मृत्युमुखी पडले आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. साहेब मदतीला धावले. त्यावेळी एका वयस्कर महिलेने साहेबांना मिठी मारून केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. मंत्रिमंडळात निर्णय घेतला गेला, संपूर्ण गावचे पुनर्वसन करायचे आणि साहेबांनी ते अल्पकाळात केलेही. छोट्या-मोठ्या अशा शेकडो घटना आहेत की, साहेब तिथे मदतीला धावून गेले आहेत.
आज आपण सहजपणे कुणालाही कार्यसम्राट, हृदयसम्राट अशा उपमा देत असतो. खरे तर त्यात काहीच तथ्य नसते. वस्तुस्थिती वेगळीच असते. आपलाही त्यात स्वार्थ असतो. वळसे पाटील साहेबांनी तब्बल ३६ वर्षे आमदार म्हणून, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री म्हणून केलेला या भागाचा विकास, कोरोना महामारीत नागरिकांना केलेली मदत, आणि आता चालू असलेली पूरग्रस्तांसाठीची मदत. ऑगस्ट २०१९मध्ये कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी केलेली मदत, हे सर्व पाहता वळसे पाटील साहेब हे केवळ कार्यसम्राट, हृदयसम्राट नाहीत तर संकटात सापडलेल्यांसाठी ते जातीने मदत करणारा खरा देवमाणूस आहे. मधल्या काळात राज्यात काही राजकीय समीकरणे बदलली, पक्ष फुटला आणि साहेबांना मानणारे अनेक लोक नाराजही झाले. पण कामाच्या जोरावर व विश्वासावर साहेबांनी अष्टविजय संपादन केला.
खूप काही प्रसंग आहेत. ही केवळ स्तुती नाही, तर वस्तुस्थिती आहे, त्यात काही स्वार्थ भाव नाही. आज स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख ही मंडळी आपल्यात नाहीत याची खंत वाटते. खरं सांगू मित्रांनो, वळसे पाटील साहेब यांचे कार्य आणि त्यांची कार्यपद्धती पाहता, तेच आपणा सर्वांसाठी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि सर्वकाही आहेत. समाजाच्या अखंडित सेवेसाठी त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच भीमाशंकर चरणी आणि महागणपती चरणी विनम्र प्रार्थना..

(शब्दांकन- भरत पचंगे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

Delhi Riots 2020 Update : ‘’अचानक नव्हता उफळला दिल्लीत हिंसाचार, सत्ता बदलण्यासाठीचा तो होता कट’’ ;पोलिसांचा दावा!

Rohit Arya News: नाराजी सरकारवर; पण माथेफिरूचा मुलांच्या जीवाशी खेळ, पडद्यामागची फिल्मी गोष्ट आली समोर

Sepsis Explained: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी जीवघेण्या सेप्सिसमुळे गंभीर; वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

Latest Marathi News Live Update : वादळामुळे गुजरातच्या बोटींनी भाईंदरच्या उत्तन किनाऱ्यावर घेतला आश्रय

SCROLL FOR NEXT