सणसवाडी, ता. २ : हाणामारी, खंडणी, फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संतोष उर्फ पिंटू रंभाजी दरेकर व विक्रम रंभाजी दरेकर (दोघेही रा. सणसवाडी, ता. शिरूर) या दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांची सणसवाडी गावात धिंड काढली. या दोघांनी कंपनीतील एका कामाच्या ठेक्यावरून भावकीतीलच रोशन हिरामण दरेकर (वय २४, रा. सणसवाडी) यांचा कोयत्याने खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून या दोन्ही आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत त्यांची दहशत संपविण्यासाठी थेट गावातूनच धिंड काढली.
रोशन दरेकर यांचे गेल्या काही दिवसांपासून गावातील प्रगती इन्फ्रा कंपनीमध्ये जेसीबीने काम सुरु होते. याच कामानिमित्त ते त्यांच्या चारचाकीमधून कंपनीमध्ये जात असताना पिंटू व विक्रम या दोघांनी चारचाकी अडवून तिची काच कोयत्याने फोडली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी रोशनला, ‘‘तू पुन्हा प्रगती इन्फ्रा कंपनीसह कोणत्याच कंपनीत काम करायचे नाही, काम घेतल्यास थेट गोळ्या घालून मारुन टाकीन,’ अशी धमकी देत त्यांचा कोयत्याने खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोशन तेथून कसेबसे सुटले व पळून गेले.
यानंतर, रोशन यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी संतोष व विक्रम यांच्यावर शिवीगाळ, मारहाण, जिवे मारण्याची धमकी असे गुन्हे दाखल करून दोघांना तत्काळ अटक केली. तसेच, सणसवाडी गावातून दोघा भावांची हातात बेड्या घालून धिंड काढली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.