पुणे

छत्रपती संभाजीराजांच्या चरणी हजारो भाविक लीन

CD

शिक्रापूर, ता. १ : अभिवादन दिनाच्या निमित्ताने पेरणे फाटा (ता.हवेली) येथे आलेले हजारो भाविक वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराज समाधिस्थळावर नतमस्तक झाले. अर्थात जवळच असलेल्या गोविंद गोपाळ यांच्या समाधी स्थळाचेही दर्शन या भाविकांनी घेतले. दरवर्षीच्या तुलनेत मात्र यावर्षी भाविकांची संख्या जवळपास निम्मी एवढी राहिल्याचे चित्र राहिले असून प्रशासकीय पातळीवर मात्र पूर्ण चोख व्यवस्था राबविली गेली.
कोरेगावभीमा (ता.शिरूर) नजीक पेरणे फाटा (ता.हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी दिवसभरात लाखो भीमसैनिकांनी मानवंदना दिली. जमलेल्या हजारो भीमसैनिकांनी पुढे कोरेगाव-भीमा येथे दाखल होऊन पीएमपीएलच्या बसमधून वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावर जाणे पसंत केले. कोरेगाव ते वढू अशा सलग मोफत बससेवेळेमुळे वढुकडे जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी राहिली. छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधिस्थळ व गोविंद गोपाळ यांचे समाधिस्थळावर बॅरिगेटींग करण्यात आले होते. वढूमध्ये सकाळपासूनच दोन्ही समाधिस्थळावर अभिवादन व नतमस्तक होण्यासाठी मोठ्याप्रमाणावर भीमअनुयायी उपस्थित होते. यामध्ये तरुणांसह महिलांचाही मोठा सहभाग होता. सकाळपासूनच मानवंदनेसाठी मोठ्याप्रमाणावर बांधवांनी गर्दी. केली असून गर्दीच्या नियमनास प्रथम प्राधान्य देण्यात आले असून पूर्ण क्षेत्र सीसीटिव्ही व ड्रोनच्या साहाय्याने निगराणीखाली होते. शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड, वढू बुद्रुकचे सरपंच कृष्णा आरगडे, उपसरपंच संगीता सावंत, माजी सरपंच ज्ञानेश्वर आरगडे, माजी उपसरपंच हिरालाल तांबे, ग्रामपंचायत अधिकारी शंकर भाकरे, पोलिस पाटील जयसिंग भंडारे, लेखनिक संतोष शिवले आदींनी येथील बंदोबस्तासाठी नियुक्त ५०० पोलिसांचा फौजफाटा व इतर खात्यांचा समन्वय करून दिवसभराचे गर्दी नियोजन यशस्वी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT