पुणे

केंदूरमध्ये सशस्त्र चोरट्यांचा धुमाकूळ

CD

शिक्रापूर, ता. १७ : केंदूर (ता. शिरूर) येथील सुक्रेवाडी वस्तीवर शुक्रवारी (ता. १६) पहाटेच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबाच्या घराचा दरवाजा उघडून कुटुंबीयांना कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करीत सोन्याचे साडेचार तोळे वजनाचे दागिने व रोख रक्कम लुटल्याचा प्रकार घडला.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, शुक्रवारी (ता. १६) पहाटेच्या सुमारास चौफुला- पाबळ रस्त्यावर असलेल्या केंदूर येथील सुक्रेवाडी येथील बबन सुक्रे हे त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या राहत्या घरात झोपलेले असताना मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दरवाज्याच्या सापटीतून हात घालून दरवाजाची कडी हाताने उघडून घरामध्ये प्रवेश केला. यावेळी बबन सुक्रे हे जागे झाले असता तिघाही चोरट्यांनी त्यांना कोयता दाखवत, ‘तुझ्या जवळचे सर्व दागिने दे, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही,’ असे म्हणून त्यांना मारहाण करत हातातील कोयता उलटा धरुन त्याचा दांडा त्यांना मारला.
यावेळी बबन यांनी जोरात आरडाओरडा केला असता त्यांची पत्नी लताबाई सुक्रे या जाग्या झाल्या. हे पाहून चोरट्यांनी आपला मोर्चा लताबाई यांच्याकडे वळविला. त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेत घराला बाहेरून कडी लावून हे सर्व चोरटे बाहेर पळून गेले. तेथे शेजारील खोलीमध्ये झोपलेल्या बबन यांच्या सूनबाई काजल हिच्या खोलीमध्ये प्रवेश करत तिला देखील दमदाटी करून, ‘तुझ्या अंगावरील सर्व दागिने काढून दे, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही,’ अशी दमबाजी केली. हे करताना त्यांनी त्यांच्या कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून कपाटातील दागिने, रोख रक्कम आदी सर्व काढून घेत पोबारा केला. दरम्यान, अत्यंत भेदरलेल्या अवस्थेतील बबन सुक्रे यांनी मोबाइलवर फोन करून वस्तीवरील अशोक सुक्रे यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी बबन सुक्रे यांच्या घरांना लावलेल्या सर्व कड्या उघडल्या व शिक्रापूर पोलिसांना माहिती कळविली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी येईपर्यंत सर्व चोरटे पसार झाले होते. घडलेल्या घटनेबाबत बबन दशरथ सुक्रे (वय ७०) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप हे करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update :मध्य रेल्वे मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १६.१६ लाख प्रवाशांकडून १.३१ कोटी रुपये दंड वसूल बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

SCROLL FOR NEXT