शिक्रापूर, ता. ३१ : जमीन नावावर करीत नाही म्हणून मुलगा व जावयाने मिळून ज्येष्ठास लोखंडी गजाने व कोयत्याने मारहाण केली. ही घटना करंदी (ता.शिरूर) येथे घडली. नवनाथ ढोकले (वय ५९, रा.करंदी, ता.शिरूर) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.
शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की, करंदी येथील ढोकले हे शिक्रापूर-चाकण रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलसमोर बसले होते. तिथे त्यांचा मुलगा अलोक व जावई स्वप्नील दरेकर हे आले. यावेळी दोघांनीही, ‘तुम्ही आपली जमीन अलोक याच्या नावावर का करून देत नाही,’ जमिनीच्या वादातून मुलगा अलोक व जावई स्वप्नील दरेकर यांनी नवनाथ यांना मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी नवनाथ ढोकले यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. स्वप्नील (रा.करंदी) व अलोक (सध्या रा. सांगवी सांडस, ता.हवेली, मूळ रा.करंदी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.