पुणे

जमिनीच्या जुन्या वादातून कासारी फाट्यावर हाणामारी

CD

शिक्रापूर, ता. २२ पुणे- अहिल्यानगर महामार्गावरील कासारी फाटा (ता. शिरूर) येथे महामार्गालगत असलेल्या जमिनीच्या वादातून दोन युवकांच्या गटात हाणामारी झाली. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी विक्रम कांतिलाल रासकर, गणेश बबन ब्राम्हणे, महेश बबन ब्राम्हणे, पृथ्वीराज पिसाळ यांच्यासह एका अनोळखी युवकावर परस्परविरोधी तक्रारींनुसार गुन्हे दाखल केले.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की, कासारी फाटा येथे पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत महेश ब्राम्हणे यांच्या मालकीची जमीन असून, या जमिनीच्या खरेदीच्या कारणाने यापूर्वी विक्रम रासकर व महेश ब्राम्हणे यांच्यामध्ये काही वाद झालेले होते. या वादाच्या पार्श्वभूमिवर नुकतेच ब्राम्हणे व रासकर हे दोघेही सदर जमिनीचे ठिकाणी एकाच वेळी आल्याने त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. हा वाद वाढत जाऊन दोघांनीही एकमेकांना मारहाण केल्याचा आरोप करत दोघेही शिक्रापूर पोलीस ठाण्यात आले. दोघांनीही एकमेकांच्या विरोधात फिर्यादी दिल्या.
याबाबत गणेश बबन ब्राम्हणे (वय ४०, रा. इकोग्राम सोसायटी, ता. शिरूर) व विक्रम कांतिलाल रासकर (वय ३९, रा. रासकर मळा, कासारी) या दोघांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात एकमेकांच्या विरोधात फिर्यादी दिल्याने पोलिसांनी विक्रम कांतिलाल रासकर, गणेश बबन ब्राम्हणे व महेश बबन ब्राम्हणे (दोघेही रा. इकोग्राम सोसायटी), पृथ्वीराज पिसाळ (रा. वाई, जि. सातारा) यांच्यासह एका अनोळखी युवकावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार अतुल पखाले व नरेंद्र गायकवाड हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

Gas Cylinder Black Market : घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT