शिक्रापूर, ता. २५ : शिरूर तालुक्यातील शिक्रापुरातील तळेगाव रस्त्यावर किरकोळ अपघाताच्या वादातून २० जणांच्या टोळक्याने ‘कोयता गँग’चे नाव सांगत कपडा व्यापाऱ्याच्या दुकानात शिरून दोन भावांना जबर मारहाण केली. या टोळक्याने दुकानातील ७० हजार रुपये आणि सोनसाखळी लंपास केली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे.
येथील ‘एसआर ब्रँड हब’चे संचालक श्रीकांत नरके हे मोटारीने दुकानासमोर येत असताना दुचाकीने त्यांच्या मोटारीला धडक दिली. याचा जाब विचारल्याने दुचाकीवरील आर्यन गडदरे व सार्थक गावडे यांनी त्यांच्या २०-२२ मित्रांना बोलावून घेतले. या टोळक्याने ‘आम्ही कोयता गँगचे आहोत’ असे ओरडत श्रीकांत नरके व त्यांचे भाऊ राजेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कोयत्याने मारण्याची धमकी देत दुकानातील रोकड व दागिने पळवले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी श्रीकांत नरके (वय ३५, रा. नरकेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी आर्यन गडदरे, सार्थक गावडे, अथर्व साळवे, कार्तिक सावंत, क्रिष चकोर, ओम गायकवाड, सार्थक कराळे, सोहम फिरोदिया व इतर १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार बापू हाडगळे करत आहेत.
शिक्रापूर हद्दीत कोणतीही गँग सक्रिय नाही. कुणी गँगचे नाव सांगून दहशत माजवत असेल, तर त्यांचा कडक बंदोबस्त केला जाईल. नागरिकांनी न घाबरता थेट तक्रार करावी, पोलिस कडक पावले उचलत आहेत.
- दिपरतन गायकवाड, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.