पुणे

निवडणुकीत दुभंगलेल्या गावाची सात लाखांच्या मदतीचा हात

CD

शिक्रापूर, ता. ५ : पंचायत समिती निवडणुकीमुळे दोन गटात उभ्या राजकीय दुभंगलेल्या केंदूरकरांनी गावातील रोहिदास ऊर्फ नाना साकोरे (वय ४५) यांच्या मृत्यूनंतर हाच राजकीय मतभेद विसरून तब्बल सात लाखांची रोख मदत त्यांच्या कुटुंबासाठी संकलित केली. विशेष म्हणजे साकोरे यांच्या दोन्ही मुलींच्या शाळेची संपूर्ण जबाबदारीही माजी सरपंच सुवर्णा सतीश थिटे उचलली.

केंदूर (ता. शिरूर) येथील साकोरे (वय ४५) यांचा शनिवारी (ता. २१) हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संपूर्ण गाव हळहळले. त्यामुळे गावात विधायक कामांसाठी ‘अभिनव केंदूरकर’ या नावाने एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला. त्यात गावातील स्वप्नील थिटे, रामभाऊ थिटे व सचिन साकोरे यांनी नानाच्या कुटुंबाला मदती करण्यासाठी आवाहन केले. रमेश साकोरे, नानाभाऊ साकोरे यांच्यासह अनेकांनी पुढे हे आवाहन गावच्या ग्रुपला टाकले आणि पाच दिवसात नानाच्या कुटुंबासाठी तब्बल सात लाखांची मदत उभी राहिली. यातील साडेपाच लाख रुपये रोख स्वरूपात जमा झाले. ही रक्कम नानाच्या कुटुंबाला त्यांच्या तेरावा विधीच्या दिवशी देण्याचा निर्णय झाला आहे.
सणसवाडीतील उद्योजक राजेश रवी भुजबळ, शिक्रापूरातील अमर करंजे, वाजेवाडी येथील दादा वाजे यांनी मोठी रक्कम दिल्याचे चित्र ही केंदूरकरांसाठी सुखावणारे राहिले.


मुलींच्या शिक्षणाची जबाबदारीही घेतली
गावातील उद्योगपती गजानन साकोरे, सुभाष बळवंत गावडे व माजी सरपंच प्रमोदशेठ पऱ्हाड यांनी अनुक्रमे ५०, ३० व २५ हजारांची भरीव मदत नानांच्या कुटुंबासाठी दिली. माजी सरपंच सुवर्णा सतीश थिटे यांनी सातवी व पाचवीत शिकत असलेल्या नानाच्या दोन्ही मुलींच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली.

संपूर्ण गाव एकत्र आले तर एखादे कुटुंब उभे करू शकते हेच खरे विधायक काम. गावागावात अशा मदती करण्याचा एक रिवाज व्हावा आणि तीच संस्कृती म्हणून विकसित व्हावी एवढीच अपेक्षा.
- डॉ.मानसी साकोरे (आयपीएस अधिकारी)

05270

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रियांका चोप्राने मुलीच्या जन्मासाठी सरोगसी करायचं का ठरवलं? ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत म्हणाली- माझं बाळ हे...

Petrol Storage: भारतात पेट्रोलचा साठा कसा आणि कुठे केला जातो? जाणून घ्या भारताच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हची संपूर्ण माहिती

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई महापालिकेचा गोंधळ; परिवहन सभापतींसाठी कॅबिनच नाही

Arjun Tendulkar Marriage: अर्जुनचं लग्न लागलं, वरमाळा घालताच सानियाला मारली मिठी; सचिन-अंजली अन् साराही खूश; Video Viral

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

SCROLL FOR NEXT