पुणे

करंदी येथे दोन महिलांना बेदम मारहाण

CD

शिक्रापूर, ता. २७ : दहा दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये झालेल्या भांडणानंतर माफी मागितलेल्या करंदी (ता.शिरूर) येथील दोन महिलांना घरी येत १५ जणांनी बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे यातील एक महिला मारहाणीने बेशुद्ध झाल्यावरच सर्वजण पळून गेले. हल्लेखोरांमध्ये १० महिलांचा समावेश असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
याप्रकरणी आशा बाळासाहेब कुंद्रूप (वय ३६, रा. नप्ते वस्ती, करंदी, ता.शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. तर प्रदीप किसन मांजरे, सुनील अनिल मांजरे, आदेश दत्तात्रेय भोर, आकाश नवनाथ लोहोट, लता अनिल मांजरे, शकुंतला किसन मांजरे, राजूबाई बाळासाहेब गावडे, रोहिणी दत्तात्रेय भोर, वैशाली नवनाथ भोर (सर्व रा.वाजेवाडी, ता.शिरूर), निता पठारे (रा. बहुळ, ता.खेड), साधना लोंढे (रा.दौंडकरवाडी, शेलपिंपळगाव, ता.खेड) यांच्यासह तीन अनोळखी महिला व एक व्यक्तीविरुद्ध मारहाण, शिवीगाळ, धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.

करंदी (ता.शिरूर) येथील आशा कंद्रूप व सुषमा नप्ते या दोघी गुरुवारी (ता. १९) एका हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या होत्या. यावेळी त्यांचा सुनील मांजरे व प्रदीप मांजरे यांच्यासोबत काही कारणाने वाद झाला होता. यावेळी दोन्ही महिलांची सुनील व प्रदीप यांची माफी मागितली व त्या दोघी तिथून निघूनही गेल्या. गुरुवारी (ता.२६) आशा कंद्रूप व सुषमा नप्ते या दोघीही त्यांच्या करंदी येथील राहत्या घरी असताना दोन मोटारीतून (एमएच-१२ पीएच ६५७४ व एमएच-१२ वायएस ३२१२) काही महिला व व्यक्ती आले व त्यांनी आशा व सुषमा या दोघींना शिवीगाळ, दमदाटी करत काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीत सुषमा नप्ते या महिलेला जास्त मार लागल्याने ते त्याच ठिकाणी बेशुद्ध पडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संदीप बनकर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT