शिक्रापूर, ता. ३ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) मधील माळीमळा वस्तीत राहणारे तुकाराम बाबूराव रसाळ (वय ८२, रा.माळीमळा, तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर) या ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने जवळच्याच विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर आकस्मात मृत्यूची नोंद केली.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार तुकाराम रसाळ सोमवारी (ता. २) रात्रीच्या सुमारास जेवण करून घरात त्यांच्या खोलीत झोपले होते. सकाळच्या सुमारास कुटुंबीयांना तुकाराम हे त्यांच्या खोलीत नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. या शोधात घराजवळील विहिरीच्या कडेला त्यांची चप्पल, टोपी व काठी दिसून आल्याने त्यांचा शोध घेणाऱ्यांनी विहिरीत पाहिले असता त्यांना तुकाराम यांचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार संदीप इथापे यांनी घटनास्थळी धाव घेत आपदा मित्र वैभव निकाळजे, गणेश टिळेकर, राहुल गायकवाड यांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. याबाबत प्रतीक हनुमंत रसाळ (वय ३१) यांनी पोलिस ठाण्यात खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस हवालदार संदीप इथापे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.