पुणे

सणसवाडीतील खंडणाखोरावर गुन्हा दाखल

CD

सणसवाडी, ता. ६ ः तुझ्या कंत्राटात मला हिस्सा दे, नाहीतर मला महिन्याला हप्ता दे... असे म्हणत भरत गव्हाणे (रा. कोरेगाव भिमा, ता. शिरूर) याने सणसवाडी-कोरेगाव भिमा येथील के-मेटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कंत्राटी कंपनीच्या सुपरवायझरला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी भरत गव्हाणे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की, सणसवाडी-कोरेगाव भिमा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील हद्दीत असलेल्या के-मेटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये २५ फेब्रुवारीला सायंकाळी पाचच्या सुमारास भरत शहाजी गव्हाणे याने कंपनीमध्ये अनाधिकाराने प्रवेश करून मनिषा सिव्हील कन्स्ट्र्क्शनचे सुपरवायझर हेमंत शर्मा, अविनाश घुगे, दिपक कोकाटे यांना थेट शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. या वेळी त्याने तिघांना तुमच्या कंत्राटामध्ये मला हिस्सा द्या, नाहीतर मला महिन्याला हप्ता द्या. तुम्ही जर यातील काहीच करणार नसाल, तर तुम्हाला इथे राहू देणार नाही, असे धमकावले. याबाबत रामदास कुंडलीक धुमाळ (वय ४३, धंदा-सिक्युरीटी सुपरवायझर, रा. सणसवाडी, ता. शिरूर, मुळ रा.थेरगाव, ता.कर्जत, जि. अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरुन भरत शहाजी गव्हाणे यांच्यावर खंडणी, शिवीगाळ, दमदाटी, मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे करीत आहेत. दरम्यान, आरोपी भरत गव्हाणे याला अद्याप अटक झाली नसून त्याला पकडण्यासाठी एक पथक नियुक्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT