शिक्रापूर, ता. १२ : जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे वाहनाचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की, जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील गणेश मोरे हे त्यांच्या ताब्यातील चारचाकीमधून (क्र. एम.एच. १२ डब्ल्यू.व्ही. ७०६२) शिक्रापूर येथे आले असता त्यांना संजय गिलबिले यांच्या दुचाकीचा धक्का लागला. तेथे दोघांमध्ये किरकोळ शाब्दीक चकमक झाली. दरम्यान गणेश मोरे हे आपल्या जातेगाव बुद्रुक येथील घरी गेले. त्याच दिवशी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संजय गिलबिले यांचा मुलगा आदेश याच्यासह काही युवक गणेश मोरे यांच्या घरासमोर आले व त्यांनी गणेश याला शिवीगाळ व दमदाटी करत, ‘आमच्या वडिलांसोबत भांडणे करतो का?’ असे म्हणून त्याला काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान गणेश याची आई व पत्नी भांडण मिटविण्यासाठी मध्ये पडल्या असता त्यांना देखील या टोळक्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गणेश माणिक मोरे (वय ३८, रा. जातेगाव बुद्रुक) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आदेश संजय गिलबिले (रा. शिक्रापूर, ता. शिरूर), प्रवीण नवनाथ धुमाळ (रा. पिंपळे धुमाळ, ता. शिरूर), साहिल मल्हारी भुजबळ (रा. शिक्रापूर) आदींसह अन्य दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस हवालदार बापू हाडगळे हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.