पुणे, ता. ६ : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा आधुनिक आविष्कार असलेल्या ‘फोक आख्यान’ या सांगीतिक कार्यक्रमाचे लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. ७) सायंकाळी ६ वाजता आयोजन केले आहे. ‘म्हाडा’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आहे. ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पार्थ पवार व श्रीरंग बारणे, शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, माजी खासदार आनंद परांजपे, संजय काकडे आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या लोकसंगीत व लोकपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘फोक आख्यान’ ही संकल्पना साकारण्यात आली आहे. या कार्यक्रमात पोवाडा, लावणी, भारूड, गोंधळ, ओवी आणि गवळणी यांसारख्या पारंपरिक लोककलांची आकर्षक गुंफण सादर केली जाते. या लोककलांना आधुनिक वाद्यसंगीत व रंगमंचीय मांडणीची जोड देण्यात येत असल्याने तरुण प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आहे. शिवकालीन इतिहास, भक्तिपर परंपरा आणि ग्रामीण जीवनाचे विविध पैलू यामधून प्रभावीपणे उलगडले जातात. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.