शिक्रापूर, ता. २६ : शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ‘सुरक्षा कवच’ उपक्रम राबविण्यात येत आहे. सीसीटीव्ही, तक्रार पेटी सक्तीची करत छेडछाडीच्या प्रकारांविरुद्ध सामूहिक यंत्रणा कार्यान्वित करण्याची घोषणा पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केली.
शिक्रापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक यादव यांनी हद्दीतील ११० शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलिस आणि शिक्षकांनी पालकाच्या भूमिकेतून काम करण्याचे आवाहन केले. नुकत्याच झालेल्या बैठकीत सायबर गुन्हे, छेडछाड प्रतिबंध आणि शाळा-पोलिस समन्वय यावर सविस्तर चर्चा झाली. शाळा सुटल्यावर होणारी टवाळखोरी रोखण्यासाठी तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ''गुड टच-बॅड टच''बाबत जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला. या उपक्रमाला सर्व मुख्याध्यापकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
शाळांसाठी पोलिसांच्या प्रमुख सूचना
-शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा व तक्रार पेटी बसविणे बंधनकारक.
-संशयास्पद हालचालींचे फुटेज पोलिसांना उपलब्ध करून देणे.
-छेडछाडीची घटना तातडीने पोलिसांना कळविणे.
-गुड टच-बॅड टच व मोबाईल वापराबाबत विद्यार्थिनींचे प्रबोधन करणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.