पुणे

कुरुळी परिसरात महावितरणचा सावळा गोंधळ

CD

कुरुळी, ता. १० ः गेल्या दोन महिन्यांपासून कुरुळी परिसरात महावितरणचा सावळा गोंधळ पाहायला मिळतो. दररोज वीजपुरवठा खंडित होतो. चाकण औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या कुरुळी परिसरात विविध प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी गोदामे, कारखाने, शेती, नागरी वस्ती असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रचंड मोठे नुकसान उद्योजकांना सोसावे लागते.
चाकण महावितरण कार्यालयात वीज ग्राहक, ग्रामस्थ, ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केले आहे. नवीन रोहित्र, वाकलेले, जीर्ण झालेले विजेचे खांब, लोबंनाऱ्या तारा बदलण्याची मागणी करून देखील काम होत नाही. परिसरात निवासी व वाणिज्य ग्राहकांची संख्या मोठी असल्याने मिळणाऱ्या तुटपुंज्या सुविधा पुरविण्यात महावितरण कर्मचारी कमी पडत असल्याचे ग्राहकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.
परिसरातील विविध छोटे-मोठे उद्योग अक्षरशः: मेटाकुटीला आले असून, याबाबत कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी उद्योगपतींनी केली.
वीज बिल भरण्यासाठी चार दिवस विलंब झाला, तर महावितरणचा कर्मचारी मीटर बंद करण्यासाठी येतो. मग दुरुस्ती का करत नाही, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. कुरुळी-मोई रस्त्याच्या साइट पट्ट्यावर नवीन खासगी रोहित्र उभारले असून, रस्त्यालगत असणाऱ्या रोहित्र व गाडीचा अपघात झाल्यास अधिकाऱ्याच जबाबदार असतील. कुरुळीच्या सोनवणेवस्ती परिसरात विविध कंपन्या, मुऱ्हे वस्ती, गायकवाड वस्ती, डोंगरेवस्ती, कडवस्ती, बागडे वस्ती परिसरात विविध कंपन्यांची गोदामे, शेतकऱ्याच्या शेतातील विविध माला कोल्ड स्टोअरेज गोदाम असल्याने अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्वरित अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी सरपंच शरद मुऱ्हे यांनी केली.

कुरुळी परिसरात महावितरणचा सावळा गोंधळ आहे. दररोज वीजपुरवठा खंडित होतो. अभियंता कर्मचारी यांचा हा हलगर्जीपणा आहे. वीजपुरवठा सुरळीत सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
शरद मुऱ्हे, माजी सरपंच, कुरुळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT