कुरुळी, ता. १८ : खेड तालुक्यातील आळंदी मंडलाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मोई- केळगाव येथील ३१ अनधिकृत गौण खनिज दगड खाण क्रशर महसूल प्रशासनाने सील करून बंद केल्याची माहिती मंडलाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.
पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार आळंदी मंडळ अधिकारी कार्यालयांतर्गत येथील अनधिकृत २८ दगड खाण क्रशर व केळगाव येथील ३ अनधिकृत दगड खान क्रशर महसूल प्रशासनाने महसूल प्रशासनाने सील करून बंद केल्या आहेत. दगड खाण क्रशर गटातील सर्व दगड, खडी, क्रेसेंड आदी माल महसूल प्रशासनाने जप्त केला असून, त्या मालाची वाहतूक करण्यात बंदी केली आहे. मंडल अधिकारी राजेंद्र वाघ, कुरुळी गाव कामगार तलाठी दिलीप राठोड, राहुल पाटील, कोतवाल यांनी कारवाई केली.
पुणे येथे झालेल्या कार्यशाळेत जिल्ह्यातील अवैध क्रशर उद्योग आणि खाणकामामुळे महसूल विभागाची प्रतिमा मलिन होत आहे, हे तातडीने थांबवावे. जिल्ह्यातील अवैध क्रशर उद्योग येत्या पंधरा दिवसांत अवैध खाणकाम बंद करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल यंत्रणेला दिले. तसेच, अन्यथा मलाच कारवाई करावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील गौण खनिज, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.