पुणे

खेड तालुक्यात ध्वजवंदन

CD

कुरुळी, ता. १७ : खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील सर्व ग्रामपंचायत, सोसायटी, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय शासकीय कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, तलाठी ऑफिस, माध्यमिक विद्यालय, खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा येथे तीन रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली.
तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. चाकण वाहतूक विभाग, एमआयडीसी परिसरातील विविध कारखान्यात ध्वजवंदन करण्यात आले. मोई येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला खासगी कंपनीने सीएसआर फंडातून वर्ग खोल्या, संगणक कक्षा, अंगणवाडी, मुला- मुलींसाठी स्वतंत्र बाथरूम, क्रीडांगण सुशोभीकरण करून तीन मजली इमारतीचे लोकार्पण आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कुरुळी (ता. खेड) ग्रामपंचायतीचे ध्वजवंदन सरपंच अनिता बधाले, उपसरपंच सुनीता बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मोई ग्रामपंचायतीचे सरपंच शीलाताई रोकडे, उपसरपंच सोमनाथ गवारी व निघोजे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनीता येळवंडे, उपसरपंच दीपक कांबळे यांनी ध्वजवंदन केले. महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ध्वजवंदन वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांचे हुकमी एक्के, भाजपचा ताकद वाढवण्याचा प्रयत्न

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 380 अंकांनी वाढला; आज Adani सह 'हे' शेअर्स राहणार फोकसमध्ये

Latest Marathi News Live Update : लोणार तालुक्यात मध्यरात्री भीषण आग

स्मिता पाटील यांच्या मृत्यूवेळी रुग्णालयात काय झालेलं? मैत्रिणीनं सांगितला किस्सा, म्हणाल्या, 'त्या' पत्रांमधून कळालं की...

दिंडोरी अपघात प्रकरणी चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सोपवला, ठेकेदार अन् अधिकाऱ्यांवर ठपका; रस्त्याचे काम अपूर्ण

SCROLL FOR NEXT