पुणे

युगेंद्र पवार यांनी थोपटले दंड

CD

काटेवाडी, ता. ४ ः खासदार सुप्रिया सुळे यांच्या दिमाखदार विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी बारामतीतून दंड थोपटले आहेत. खासदार सुळे यांच्या विजयाचा जल्लोष करताना कार्यकर्त्यांनी युगेंद्र यांना खांद्यावर उचलून घेतले यानंतर त्यांनी शड्डू ठोकत विजयाचा आनंद साजरा केला.
युगेंद्र पवार हे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे पहिलवानासारखाच शड्डू ठोकत त्यांनी आपल्या विजयाचा आनंद साजरा केल्याची चर्चा यावेळी बारामतीमध्ये रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर युगेंद्र यांनी आजोबा शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी राजकीय व्यासपीठावर प्रवेश करत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आघाडी घेतली होती. लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लढत दिल्याने आता विधानसभेला देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात घरातील चेहरा युगेंद्र यांच्या रूपाने समोर उभा ठाकला जातो की काय अशी एक चर्चा या निमित्ताने सुरू होती.

शर्मिला पवार यांचा कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष
खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी पालखी ओटा परिसरामध्ये कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष केला. तसेच कन्हेरी येथे मारुती मंदिर परिसरातील खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली होती. सुनेत्रा पवार यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात काटेवाडीपासून झाली आहे. त्यामुळे काटेवाडीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या समर्थकांची संख्या अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर येथील ग्रामपंचायत पदाधिकारी या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाली. यानंतर देखील काटेवाडीकरांनी सुनेत्रा पवार यांच्या बाजूने कौल देत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहिले होते. मात्र येथे असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या मोजक्या कार्यकर्त्यांना सोबत घेत शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार व उद्योजक श्रीनिवास पवार प्रचारामध्ये उतरले होते.


A00532

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT