पुणे

बारामतीतील मतदार सुज्ञ : श्रीनिवास पवार

CD

काटेवाडी, ता. ५ ः ‘‘बारामतीचा मतदार सुज्ञ आहे. काय बरोबर काय चुकीचे हे त्यांना पक्के माहिती आहे. मागील साठ वर्षांपासून बारामतीची नाळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे येथील जनमानसाचे मत शरद पवार यांना चांगले ठाऊक आहे. शरद पवार यांच्या या आत्मविश्वासावरच आम्ही प्रचारामध्ये उतरलो. त्याची पावती मतदारांनी आम्हाला सुप्रिया सुळे यांच्या विजयामध्ये दिली,’’ अशी प्रतिक्रिया श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केली.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या सलग चौथ्या लोकसभा विजयानंतर कन्हेरी येथे बुधवारी (ता. ५) श्रीनिवास पवार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले पाहिजे. पराभवाची देखील जबाबदारी घेतली पाहिजे. उगीच कुणावरही आरोप केले जाऊ नयेत. युगेंद्र पवार हे मागील चार वर्षांपासून बारामतीमध्ये काम करत आहेत. मीडियाचा फोकस आता त्यांच्यावर गेल्यामुळे कदाचित विधानसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा होत असावी. लोक अशा चर्चा करतच असतात. मात्र चार-पाच महिन्यानंतर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये कोण-कोणा विरुद्ध लढणार हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रीय पातळीवर शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे ठरवतील. त्यामुळे आत्ताच या चर्चा करणे निरर्थक आहे.’’

बारामती मतदारसंघातील सर्व मतदारांचे मी आभार व्यक्त करते. त्यांनी मोठ्या मताधिक्याने सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहत त्यांना पुन्हा दिल्लीला पाठवले. ही लढाई कौटुंबिक पातळीवर नव्हती. राजकारणामध्ये समोर कोण उभा आहे हे पाहिले जात नाही. आपल्याला लढायचे व जिंकायचे एवढेच माहीत असते. सुप्रिया सुळेंचे येथे काम आहे. तसेच पवार साहेबांवर मतदारांचे प्रेम व निष्ठा देखील आहे. त्यामुळेच खासदार सुप्रिया सुळे यांचा विजय सुकर झाला.
-शर्मिला पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT