पुणे

काटेवाडीत रंगला मेंढ्यांचा रिंगण सोहळा

CD

काटेवाडी, ता. ७ : काटेवाडी (बारामती) येथे जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रविवारी (ता.७) मेंढ्यांचे रिंगण सोहळा पार पडला. राम कृष्ण हरी, ज्ञानबा-तुकाराम आशा जयघोष करीत वैष्णवांच्या अलोट उत्साहामध्ये, वरुण राजाच्या साक्षीने मानाच्या मेंढ्या धावल्या. रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
आषाढी वारीनिमित्त मजल दर मजल करीत वैष्णवांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामती मुक्कामानंतर दुपारी काटेवाडीत भोजन व विश्रांतीसाठी विसावला होता. सणसर मुक्कामी मार्गस्थ होत असताना मेंढ्याचे रिंगण झाले. तुकोबांची पालखी काटेवाडी येथे पोहोचताच भक्तिमय वातावरणात ग्रामस्थांनी स्वागत केला. विसाव्यानंतर पालखी सणसरच्या दिशेने निघाली असता यावेळी मानाच्या मेंढ्याचे रिंगण पार पडले. एका पाठोपाठ एक अशा मेंढ्या धावल्या. वारकरी पायी प्रवास, ऊन पावसाची तमा न बाळगता भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन निघतो. या दरम्यान रिंगण सोहळा म्हणजे या पायी प्रवासाचा शिण घालवणारा असतो. त्यामुळे वारकरी, टाळकरी, माळकरी, वीणेकरी , तुळशीवाल्या महिला पालखीभोवती हरिनामाचा गजर करीत रिंगणाभोवती उभ्या होत्या.
रिंगण सोहळा झाल्यानंतर पालखीने इंदापूर तालुक्यात प्रवेश केला. रविवारी (ता. ७) रात्री सणसर येथे संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम पार पडला. आषाढी पालखी सोहळ्यामध्ये उभे रिंगण आणि गोल रिंगण अशा दोन रिंगणाच्या पद्धती पाहायला मिळतात. हा रिंगण सोहळा पाहायला दोन्ही पालखी मार्गावर वारकरी प्रचंड गर्दी करतात.

‘मेंढ्यांवरचा रोग संपू दे’ची प्रार्थना
काटेवाडीत संत तुकाराम महाराजांची पालखी आली असता एका मेंढपाळाने आपल्या मेंढ्यांसह तुकोबारायांना तीन रिंगण घालून, मेंढ्यांवरचा रोग संपू दे आणि त्या जिवंत राहू दे अशी प्रार्थना त्यावेळेस त्या मेंढपाळाने केली होती. पुढे हीच परंपरा कायम राखली गेली आणि आजही काटेवाडीत संत तुकोबांच्या पालखीचे आगमन होताच मेंढ्यांचे अनोखे रिंगण पार पडते. तत्पूर्वी दुपारी पालखी रथाचे स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सरपंच मंदाकिनी भिसे, उपसरपंच मिलिंद काटे तसेच ग्रामपंचायत सदस्य, अनेक संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये झाले.

00581

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

SCROLL FOR NEXT