काटेवाडी, ता. ५ : राज्य सरकारने खरीप २०२३ च्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये २ हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय मागील दोन महिन्यांपासून प्रतीक्षेत होता. अखेर शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपली असून पुणे जिल्ह्यातील २६ हजार ४५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकतेच ६ कोटी २६ लाख ६६ हजार ७५७ रुपये रक्कम वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
सोयाबीन व कापूस अनुदानासाठी राज्य सरकारकडून तारीख पे तारीख दिली जात होती. अनुदानाच्या पहिल्या टप्प्याचं वितरणाचा ई शुभारंभ मंत्रिमंडळ बैठकी करण्यात आला होता. जिल्ह्यातील ६१ हजार ४६२ शेतकरी सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र ठरले.
दृष्टिक्षेपात
* ई केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हजार रक्कम जमा करण्यास सुरुवात
* पहिल्या टप्प्यातील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.
* शेतकऱ्याचे कागदपत्रे जसजशी जमा होतील आणि आधारचे ई केवायसी पूर्ण होईल तसतसे अनुदान होणार जमा
* ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच डीबीटी पद्धतीने अनुदान जमा करण्यात येणार आहे.
‘संमती पत्र भर द्या’
अनुदानासाठी पात्र ठरलेले खातेदार दोन प्रकारचे आहेत. यामध्ये वैयक्तिक व सामुदायिक खातेदार असे प्रकार पडतात. वैयक्तिक खातेदारांनी आपले आधार कार्ड व मोबाईल नंबर नमूद करून संमती पत्र भरून द्यावे, असे कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी सांगितले.
सामुदायिक खातेदारांमध्ये ज्याच्या नावावर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे अशा खातेदाराने इतर सह खातेदारांचे त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र स्वाक्षऱ्यांसह सादर करावयाचे आहे. अशा पद्धतीने जमा होणाऱ्या संमती पत्र व ना हरकत प्रमाणपत्रासाठी एक ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. संबंधित पोर्टलवर या कागदपत्रांची डाटा एन्ट्री केली जाते. अशा पद्धतीने ज्या खातेदारांचे संमती पत्र, ना हरकत प्रमाणपत्र व ई केवायसी पूर्ण झाली आहे अशा खातेदारांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे.
- संजय काचोळे, जिल्हा कृषी अधीक्षक
तालुका......शेतकरी संख्या..... वर्ग रक्कम
आंबेगाव......२६७९...........५,४८७,१७१
बारामती......१,५४६.........४,४८६,३२५
भोर...........३२०..........६,५४,०३३
दौंड........... ३२६..........९,२७,८६५
हवेली........९७.............१,५१,५७८
इंदापूर......७३०.............२,२,१०,१०२
जुन्नर......११,६१७..........२८,६,७५,४९१
खेड........७,२४२...........१५,२,४१,६५४
मावळ.....२५३...............६,५८,०७६
मुळशी....... ७६..............१,७२,५८३
पुरंदर........५६८.............१,१,५३,४८९
शिरूर........९९७.............२,८,३६,०४२
वेल्हे......... ७.................१०,३५०
52054
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.