काटेवाडी, ता. ५ : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद, सोयाबीन व मूग २०२४-२५ च्या हंगामासाठी शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. सोयाबीन प्रतिक्विंटल ४ हजार ८९२, उडीद ७ हजार ४००, मूग ८ हजार ६८२ प्रति क्विंटल या हमीदराने शासन खरेदी करणार आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने हंगाम २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी नऊ सप्टेंबरला जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडमार्फत मुग, उडीद व सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बारामती साठी मंजूर झाले आहे. या हमीभाव केंद्रासाठी शेतकरी नाव नोंदणी प्रक्रिया एक ऑक्टोबर २०२४ च्या पत्रानुसार सुरू झाली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुनील पवार व उपसभापती नीलेश लडकत यांनी दिली.
आवश्यक कागदपत्रे
विक्री करावयाच्या मालाची ऑनलाइन नोंद
सन २०२४-२५ पिकपेरा सहीत ७/१२ उतारा
आठ-अ, आधारकार्ड, मोबाईल नंबर
IFSC कोड सह बँकेचे पासबुक झेरॉक्स
येथे करा नोंदणी
१५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत शेतकऱ्यांनी बाबालाल काकडे नीरा कॅनॉल संघ, तीन हत्ती चौक बारामती येथे नाव नोंदणी करावयाची आहे.
बारामती मुख्य यार्ड येथे प्रत्यक्ष खरेदी केंद्र ऑनलाइन नाव नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल १५ ऑक्टोबर २०२४ पासून समितीच्या यांत्रिक चाळणी येथे खरेदीस सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणताना शासनाचे निकषाप्रमाणे एफएक्यू दर्जाचा व स्वच्छ आणि वाळवून आणावा.
- अरविंद जगताप, सचिव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.