पुणे

बारामती तालुक्यात जपणार पशुस्वास्थ्य

CD

काटेवाडी, ता. २५ : केंद्र सरकार पुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत १७ फेब्रुवारी २०२५ पासून बारामती तालुक्यात लाळ्या खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेस सुरुवात केली आहे, अशी माहिती तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली.

राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत लाळ खुरकूत व सांसर्गिक गर्भपात या दोन रोगांवर प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे सन २०२५ पर्यंत नियंत्रण व २०३० निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यात ऑगस्ट २०२४ ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत या कालावधीत लाळ खुरकूत लसीकरण फेरी -५ पार पडली होती. योजनेतील मार्गदर्शक सूचनेनुसार या पशुधनास दर सहा महिन्यांनी लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे. यास अनुसरून प्रतिबंधात्मक लसीकरण फेरी- ६ वी राबविण्यास आवश्यक लसमात्रा डिसेंबर २०२४ व जानेवारी २०२५ या महिन्यात जिल्हास्तरावर केंद्र शासनाद्वारे पुरवठा करण्यात आलेल्या आहेत. ही लसीकरण मोहीम ४५ दिवसांत म्हणजेच ता. ३१ मार्च २०२५ पर्यंत प्रत्यक्ष लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. ४ ते ५ महिन्याच्या वासरांना लसीची पहिली मात्रा देऊन एक महिन्यानंतर बूस्टर मात्रा देण्यात येणार आहे. याकरिता संस्थानिहाय, गावनिहाय लसीकरण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

मोकाट पशूंचेही लसीकरण
लाळ खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरण फेरी- ६ मध्ये वासरांना दिली जाणारी बूस्टर लस मात्रा दिली जात आहे याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच स्थलांतरित कळपातील पशुधन व मोकाट पशूंचे लसीकरण करा , अशा सूचना पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.


लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी पशुपालकांनी देखील यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. आपल्या पशुधनाचे काळजीपूर्वक लसीकरण करून घ्यावे. तसेच जनावरांना जंतूनाशक औषधे देखील देण्याबाबत आग्रही राहावे.
- डॉ. डी. आर. पोळ, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, बारामती
00846

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT