काटेवाडी, ता. २५ : कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांसमोर नवनवीन समस्या निर्माण होत असताना शेतकऱ्यांना तातडीने शेती सल्ला मिळावा यासाठी राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार ॲप तयार केले आहे. यातील चॅटबॉट संगणकीय प्रणाली वरदान ठरणार आहे.
कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना शेतीसंबंधी योग्य सल्ला त्यांच्या पीक पद्धती तसेच भौगोलिक पद्धतीने नुसार मिळावा, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित महाविस्तार ॲप उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये पिकाची लागवड, पीक पद्धती, कीड व्यवस्थापनाच्या पद्धती, निविष्ठांचा वापर, बाजार भाव, पीक सल्ला, मृदा आरोग्य पत्रिका, उपलब्ध गोदामे व कृषी विभागाशी संबंधित डीबीटी वरील योजनांची माहिती या ॲपमध्ये असणार आहे. हे महाविस्तार ॲप गुगल प्ले स्टोअर वर देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला त्यावर आपल्या नाव, मोबाईल क्रमांक, गाव, तालुका व जिल्हा असे पर्याय निवडावे लागणार आहेत. ही माहिती भरल्यानंतर नोंदणीकृत ॲपवर संबंधित शेतकऱ्याला ओटीपी क्रमांक मिळतो. हा ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर ॲप सुरू होते.
लिखित स्वरूपात माहिती
महाविस्तार ॲप मधील चॅटबॉट ही संगणकीय प्रणाली असून या माध्यमातून शेतकरी संवाद देखील साधू शकत आहे. या चॅटपॉटवर संबंधित शेतकऱ्यांनी शंका विचारल्यास लिखित स्वरूपात माहिती येते. तसेच या माहितीचा स्त्रोत असणाऱ्या संबंधित संस्थेचे नाव देखील येथे दिसते. आलेली ऐकवायची असल्यास तसा पर्याय देखील या चॅटबॉटवर उपलब्ध आहे. या महाविस्तार ॲपवर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती आणि व्हिडिओज उपलब्ध आहेत. या ॲपमध्ये मराठी व इंग्रजी भाषेत चॅटबॉट असून त्यावर शेतीसंबंधी कुठलाही प्रश्न विचारला असता त्याला उत्तर मिळते.
महाविस्तर चॅटबॉट सुविधा :
* शेती संबंधी प्रश्न विचारा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून माहिती मिळवा
* पीक वाढीच्या टप्प्यानुसार पीक सल्ला
* हवामानाचा अचूक अंदाज
* मृद आरोग्य पत्रिका
* खत मात्रा गणक
* हवामान अनुकूल तंत्रज्ञान
* कीड व रोग ओळख व यावर उपाय
* सर्व पिकांचे बाजारभाव
* लाभाच्या योजनांचे अर्ज सुविधा महा डीबीटी आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
* आपल्या भागातील सुविधा यांची माहिती गोदाम औजार बँक इत्यादी सुविधा यांची माहिती
* माहितीपूर्ण व्हिडिओ आणि शेतीशाळा
सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे शेती क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित महाविस्तार ॲप तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना योग्य शेती सल्ला चॅटबॉट तसेच व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. हे ॲप म्हणजे कृषी माहितीचा खजिना आहे.
- संजय काचोळे, जिल्हा कृषी अधीक्षक,
--------------------------------------
17277
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.