पुणे

अनुदानित बियाणांसाठी करा आजच अर्ज

CD

काटेवाडी, ता. २८ : राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान तूर, मूग, उडीद, मका, बाजरी व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत -सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग पिकांच्या अनुदानावरील बियाणे व पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्यासाठी गुरुवार (ता.२९) शेवटचा दिवस आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर ऑनलाइन अर्ज अर्ज करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्त्व विचारात घेता सुधारित/संकरित वाणांचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रतिशेतकरी किमान ०.२० हे ते कमाल एक हेक्टरपर्यंत मर्यादित आहे. पीक प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकरी गट हा ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणीकृत असावा. अनुदानित बियाणांसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध उपयोगी योजना राबविल्या जातात, योजनेमधून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. आता शेतकऱ्यांसाठी अनुदानामध्ये बियाणे दिली जाणार आहेत, यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरण्यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, मुग, उडीद, मका, बाजरी, भात आदी बियाणे उपलब्ध आहेत.बियाणे अनुदान योजना अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ मे २०२५ असणार आहे. व बियाणे अनुदान योजनेची सोडत १ ते ३ जून २०२५ या दरम्यान होईल. महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणे सोडत साठी ग्राह्य धरले जातील, तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबर वरती निवडीचा संदेश दिला जाईल. आणि निवड झालेल्या लाभार्थींनाच अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित कालावधी अर्ज करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandgaon News : 1.55 लाखची सोन्याची अंगठी बैलाच्या पोटात; नांदगावमध्ये शर्थीची शस्त्रक्रिया

Natural Skincare Tips: घरच्या घरी नैसर्गिक स्किनकेअर करायचं आहे? मग आजीचे गुपित फंडे नक्की ट्राय करा!

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT