पुणे

जिल्ह्यात स्वपरागसिंचन पिकांच्या पेरण्या जोमात

CD

काटेवाडी, ता. २१ : पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद, चवळी, हरभरा, भुईमूग आदी पिकांच्या स्वपरागसिंचन पिकांच्या पेरण्या जोमाने सुरू आहेत. या पिकांचे कोणतेही संकरित वाण उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.


शेतकऱ्यांमध्ये दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करण्याचा गैरसमज आहे. मात्र, सोयाबीन, मूग, उडीद, चवळी, हरभरा, भुईमूग आणि गहू यांसारख्या स्वपरागसिंचन पिकांचे सरळ वाण एकदा विकत घेतल्यानंतर पुढील दोन वर्षे बियाणे म्हणून वापरता येतात. बाजारातील महागडे बियाणे उगवले नाही तर खते, मनुष्यबळ आणि वेळ वाया जातो. तक्रारी आणि पंचनाम्यामुळे पेरणीचा कालावधी निघून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे मागील हंगामातील शिल्लक बियाण्याची उगवणक्षमता तपासून पेरणी करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

उगवणक्षमता तपासणीच्या सोप्या पद्धती
१. गोणपाट वापरून
* प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मूठभर धान्य काढून एकत्र करा.
* गोणपाटाचे सहा स्वच्छ चौकोनी तुकडे घ्या. एक तुकडा जमिनीवर पसरवा.
* धान्यातून १०० दाणे मोजून १.५-२ सें.मी. अंतरावर (बोटाच्या एका कांडाच्या अंतरावर) १०-१० च्या रांगेत ठेवा. असे तीन नमुने तयार करा.
* गोणपाटावर पाणी शिंपडून ओले करा, दुसरा तुकडा अंथरून पुन्हा पाणी शिंपडा.
* गोणपाटाची गुंडाळी करून थंड, सावलीच्या ठिकाणी ठेवा. अधूनमधून पाणी शिंपडून ओले ठेवा.
* ६-७ दिवसांनी गुंडाळी उघडून कोंब आलेले दाणे मोजा. सरासरी ७० किंवा जास्त दाणे उगवले असल्यास बियाणे बाजारातील बियाण्यासारखे गुणवत्तेचे आहे. शिफारशीप्रमाणे पेरणी करा.
* जर उगवणक्षमता ७० पेक्षा कमी असेल, तर एकरी बियाण्याचे प्रमाण वाढवावे.
* पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक आणि जिवाणू संवर्धक प्रक्रिया करा.


२. वर्तमानपत्र वापरून
* वर्तमानपत्राचा कागद घेऊन चार घड्या करा, जेणेकरून जाडी वाढेल.
* कागद पाण्याने ओला करा. प्रत्येकी १० बिया समान अंतरावर रांगेत ठेवून १०० बियांच्या १० गुंडाळ्या तयार करा.
* गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत चार दिवस ठेवा. नंतर अंकुर मोजा.

३. पाण्यात भिजवून (कमी वेळात)..
* प्रत्येक पोत्यातून मूठभर धान्य काढून एकत्र करा. १०० दाण्यांचे तीन संच तयार करा.
* काचेच्या तीन ग्लासात पाणी घेऊन दाणे ५-६ मिनिटे भिजवा.
* पाणी काढून फुगलेले किंवा टरफलावर सुरकुत्या पडलेले दाणे वेगळे करा.
* फुगलेले दाणे पेरणीसाठी अयोग्य असतात, कारण त्यांचे टरफल खराब झालेले असते किंवा बिजांकुर कूजलेले असते.
* ७० किंवा जास्त दाणे न फुगलेले आणि सुरकुत्या न पडलेले असल्यास बियाणे चांगले आहे. शिफारशीप्रमाणे पेरणी करा.

कृषी विभागाच्या तक्त्याचा वापर करावा
उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास बियाण्याचे प्रमाण वाढवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक आणि जिवाणू संवर्धक प्रक्रिया करणे आवश्यक आहे. सोयाबीन बियाण्याच्या उगवणक्षमतेनुसार पेरणीचे प्रमाण ठरविण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या तक्त्याचा वापर करावा. घरच्या बियाण्याचा वापर करून शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : तरुणांना १५ हजार रुपये मिळणार....पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा...काय आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना?

Independence Day: दिवाळीत मोदी देशाला देणार मोठे गिफ्ट, GST बद्दल केली मोठी घोषणा, करात मिळणार दिलासा

PM Narendra Modi Speech Live Update : राष्ट्रीय सुरक्षा कवच २०३५ पर्यंत आणखी मजबूत करणार- पंतप्रधान मोदी

Independence Day 2025 PM Modi : अणुधमक्यांना घाबरणार नाही, ब्लॅकमेल केलं तर...; मोदींचा लाल किल्ल्यावरून असीम मुनीरला इशारा!

Independence Day 2025 : आता मेड इन इंडिया 'सेमीकंडक्टर' चिप बाजारात येणार, पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन 'आत्मनिर्भर'ची गर्जना

SCROLL FOR NEXT