पुणे

‘संवाद वारी’ प्रदर्शनातून शासकीय योजनांची माहिती

CD

काटेवाडी, ता. २५ : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारे ‘संवाद वारी’ चित्र प्रदर्शन यंदा भाविकांसाठी खास ठरत आहे. बारामती तालुक्यातील उंडवडी गवळ्याची पालखीतळ येथे बुधवार (ता. २५) आणि बारामती शहरातील नगरपरिषद परिसरात गुरुवारी (ता. २६) हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित या प्रदर्शनात एलईडी व्हॅन, चित्ररथ आणि कलापथकाद्वारे शासकीय योजनांची जनजागृती होणार आहे.
प्रदर्शनात ३० फ्लेक्स पॅनेल्सद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना, किसान क्रेडिट कार्ड, पशुधन अभियान, बळीराजा शेतकरी योजना, सुरक्षित अन्न तपासणी, सौर कृषी वाहिनी योजना, ॲग्रीस्टॅक नोंदणी, ‘महाविस्तार-एआय’ ॲप, सायबर सुरक्षितता, जलसिंचन प्रकल्प, ज्येष्ठ नागरिक कक्ष, तृतीयपंथी कल्याण मंडळ, अनुसूचित जमाती आयोग, प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२, रमाई, शबरी, अटल बांधकाम कामगार वसाहत, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर आणि मोदी आवास योजना यांचा समावेश आहे. याशिवाय, सहकार विभागाच्या ऑनलाइन सेवा, राज्य इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५, गोवारी बांधवांसाठी स्वतंत्र योजना, दिव्यांग विभाग आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची माहितीही प्रदर्शनात उपलब्ध आहे. पालखी मार्गावरील मुक्काम तळांवर आणि संपूर्ण मार्गावर चित्ररथ, कलापथक आणि एलईडी व्हॅनद्वारे या योजनांची माहिती भाविकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT