पुणे

कीटकनाशके फवारताना घ्या खबरदारी

CD

काटेवाडी, ता. २: कीटकनाशके, रासायनिक फवारण्या करताना आपल्याकडे शेतकरी पुरेशी काळजी घेत नाहीत. याबाबतीत द्राक्ष उत्पादक शेतकरी बऱ्यापैकी सजग आहेत. मात्र, इतर शेतकरी त्याबाबत सजग किंवा गंभीर नाहीत. शरीरावर एखादी जखम असेल तर अशा व्यक्तीने तर खास करून काळजी घेणे आवश्यक असते. मात्र बऱ्याच वेळा याकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचे गंभीर परिणाम संबंधित फवारणी करणाऱ्या व्यक्तीला भोगावे लागतात, असे मत बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी सांगितले.

कीटकनाशके आणि रासायनिक औषधांचा वापर पीक संरक्षणासाठी अत्यावश्यक आहे, परंतु त्यांचा वापर करताना शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. चुकीच्या हाताळणीमुळे शेतकऱ्यांचे आरोग्य, पर्यावरण आणि पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, कीटकनाशके निवडताना आणि फवारणी करताना काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना पाळणे गरजेचे आहे, असे मत जोशी यांनी व्यक्त केले.

कीटकनाशके आणि रासायनिक औषधांचा वापर करताना काळजी घेतल्यास शेतकरी स्वतःचे आरोग्य, पर्यावरण आणि पिकांचे संरक्षण करू शकतात. अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी स्थानिक कृषी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र, आयसीएआर संस्था किंवा कृषी विद्यापीठांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


अशी ओळखा प्रमाणित कीटकनाशके
* उत्पादनावर परवाना क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादन तारीख आणि कालबाह्यता तारीख तपासावी.
* पॅकिंगवर होलोग्राम, क्यू आर कोड किंवा बारकोड असल्याची खात्री करावी, कारण बनावट उत्पादनांमध्ये अशा गोष्टींचा अभाव असतो.
*विश्वासार्ह दुकानातूनच खरेदी करावी आणि पक्के बिल मागावे, जेणेकरून तक्रार निघाल्यास पुरावा उपलब्ध असेल.

बनावट उत्पादनांपासून बाळगा सावधगिरी
*कमी किमतीच्या आमिषाला बळी पडू नये, कारण बनावट कीटकनाशके पिकांचे नुकसान करू शकतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचू शकतात.
*कीटकनाशकांचे पॅकिंग नीट तपासावे; खराब छपाई, चुकीची माहिती किंवा तुटलेली सील असल्यास ती खरेदी करू नये.
*भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा.
*एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून जैविक किंवा सेंद्रिय पर्यायांचा विचार करावा


फवारणी करताना घ्यावयाची काळजी
* हातमोजे, एन ९५ किंवा समकक्ष मास्क, डोळ्यांचे संरक्षण करणारे चष्मे, पूर्ण बाह्यांचे कपडे आणि पायात बूट घालावेत.
* फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी, जेव्हा वारा कमी असतो, तेव्हा करावी.
* रसायने हवेत पसरण्याचा धोका कमी होतो आणि जवळच्या पाणवठ्यांचे दूषितीकरण टाळता येते.
* कीटकनाशकांचे मिश्रण करताना लेबलवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
* जास्त डोस टाळावा, कारण यामुळे पिकांचे नुकसान, जमिनीची सुपीकता कमी होते
* फवारणीनंतर हात, चेहरा आणि शरीर स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुवावे. कपडे वेगळे धुवावेत आणि फवारणी उपकरणे स्वच्छ करावीत.
* फवारणी करताना जवळपास कोणीही नसावे, विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्ती.

* रसायनांच्या संपर्कामुळे श्वसनाचे विकार, त्वचेच्या समस्या किंवा
गंभीर आजार होऊ शकतात.


केंद्रीय कीटकनाशक बोर्डाच्या शिफारशीनुसार कीटकनाशकांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण
* अतितीव्र विषारी: आवेष्टनावर लाल त्रिकोण, धोक्याचे चिन्ह आणि लाल अक्षरात "Fatal Poison" (प्राणघातक विष) लिहिलेले असते.
* फार विषारी: केशरी त्रिकोण, लाल रंगात धोक्याचे चिन्ह आणि लाल अक्षरात "Poison" (विष) दर्शविले जाते.
* मध्यम विषारी: पिवळा त्रिकोण, लाल अक्षरात "Poison" (विष) लिहिलेले असते. ही कीटकनाशके जहाल गटात मोडतात.
* किंचित विषारी: निळा त्रिकोण, अक्षरात "Danger" (धोका) दर्शविले जाते.
* संभवत: हानिकारक: हिरवा त्रिकोण, अक्षरात "Caution" (दक्षता) लिहिलेले असते. ही कीटकनाशके मवाळ गटात मोडतात.

28007

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT