पुणे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशातील अभ्यास दौऱ्याची सुवर्णसंधी

CD

काटेवाडी, ता. २४ : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सन २०२५-२६ मध्ये परदेश अभ्यास दौऱ्याची संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना युरोप, इस्राईल, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाइन्स, जपान, चीन आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये प्रत्यक्ष शेती तंत्रज्ञान आणि प्रगत पद्धतींचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. या दौऱ्यासाठी शासनाकडून ५० टक्के किंवा कमाल एक लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे दिली.

काचोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि उत्पादनाची दर्जेदार सुधारणा करणे हे आजच्या काळाचे गरज आहे. यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. या अभ्यास दौऱ्यांद्वारे शेतकऱ्यांना परदेशातील शास्रज्ञ, शेतकरी आणि कृषी संस्थांशी चर्चा, प्रत्यक्ष क्षेत्र भेटी आणि तंत्रज्ञानाचा अवलंब याबाबत माहिती मिळेल.
-------------------------------------------
योजनेअंतर्गत या देशांचा समावेश
* युरोप (नेदरलॅन्ड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स): १२ दिवसांचा दौरा, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धोत्पादन.
* इस्त्राईल: ९ दिवसांचा दौरा, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन आणि कृषी यांत्रिकीकरण.
* मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाइन्स: १२ दिवसांचा दौरा, सेंद्रिय शेती आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान.
* जपान: १० दिवसांचा दौरा, फळे आणि भाजीपाला पिकांचे काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन.
* चीन: ८ दिवसांचा दौरा, विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढ आणि कृषी एक्स्पो.
* दक्षिण कोरिया: ८ दिवसांचा दौरा, आधुनिक अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान.

असे आहेत निवडीने निकष
लाभार्थी स्वतः शेतकरी असावा आणि शेती हा त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असावा.
स्वतःच्या नावे चालू कालावधीचा ७/१२ आणि ८-अ उतारा असावा.
अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक.
शेतकरी कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळेल.
आधार प्रमाणपत्राची प्रत सादर करावी.
शेतकरी किमान बारावी उत्तीर्ण असावा (प्रमाणपत्र जोडणे).
शेतकऱ्याचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त असावे.
शेतकरी वैध पासपोर्टधारक असावा.
शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी किंवा खासगी नोकरीत नसावा,
डॉक्टर, वकील, सीए, अभियंता किंवा कंत्राटदार नसावा (स्वयंघोषणापत्र प्रपत्र २).
यापूर्वी शासकीय अनुदानाने परदेश दौरा केलेला नसावा (स्वयंघोषणापत्र प्रपत्र २).


आगाऊ भरावा लागणार दौऱ्याचा खर्च
शासनाकडून दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल १ लाख रुपये अनुदान दिले जाईल. शेतकऱ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असावे.
दौऱ्याचा १०० टक्के खर्च शेतकऱ्याने प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरावा लागेल. दौरा पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल.

अर्ज प्रक्रिया :
इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२५ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. ही योजना शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील शेती तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि शेतीत नावीन्य आणण्याची उत्तम संधी आहे,
असे आवाहन काचोळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनात अभिजीत दिपकेंसोबत दिसलेली 'ती' तरुणी नेमकी कोण? अफवांमागचं सत्य जाणून घ्या...

COMMONWEALTH GAMES 2026 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! ऋषिकांत सिंगने राष्ट्रकुल विक्रम मोडला, रौप्यपदक जिंकले

Trending : सुप्रीम कोर्टाचा कडक निर्णय! कोर्टाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास होणार कारवाई, कोणती शिक्षा होऊ शकते? पाहा

Video : स्टंट करताना हात सुटला अन्... कॉमनवेल्थ गेम्समध्ये थरारक अपघात! 19 वर्षीय जिम्नास्टला स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवलं

IND vs ZIM 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला; दोन बदलांसह मैदानावर उतरला, वाचा कोणाला मिळालीय Playing XI मध्ये जागा

SCROLL FOR NEXT